महाराष्ट्र

आठवणीतला चहा..पुन्हा एकदा बनविणार ‘नॉस्टॅल्जिक’

नाशिक : प्रतिनिधी

चहा हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. त्याच्याभोवती अनेक आठवणी पेरून ठेवलेल्या असतात. चहा घेतानाच अनेकांची मैत्री जमलेली असते, तर चहा घेतानाच अनेकांची भांडणेही झालेली असतात. कॉलेज लाइफमध्ये तर हा चहा म्हणजेच सर्वस्व असतो. त्याच्याशी अनेक भावना निगडित असतात. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी कोरोनामुळे तब्बल 3 वर्षांनतर पुन्हा एकदा जनस्थान व 11.30 सलीम व्हॉट्सऍप ग्रुपतर्फे ‘आठवणीतला चहा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ठाकरे गटाला पुन्हा खिंडार

 

कॉलेजजीवन म्हटले की अनेकांना आठवते ती सलीम मामूची चहाची टपरी. अनेकजण या टपरीवर चहाचा आस्वाद घेत गप्पांबरोबर कडू-गोड आठवणी शेअर करत होते. मग त्या प्रेमाच्या गोष्टी असो अथवा राजकीय, अनेकांनी या सलीमच्या चहाच्या आस्वादाने आपली स्वप्ने रंगवली आणि त्यात यशस्वी झाले. काहीजण अजूनही वाटचाल करीत आहेत.

 

बांधकाम व्यावसायिकांना गरज लागल्यास स्वामीह फंडतातून मदत

 

याच आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत नाशिकमधील कलावंतांच्या आणि या चहा कट्‌ट्यावरच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे.
सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत आठवणीचा चहा घेण्यासाठी सकाळी 8 ते 12 या वेळेत विनामूल्य चहा देण्यात येणार असून, उपस्थित राहावे, असे आवाहन जनस्थान ग्रुपचे मुख्य अभय ओझरकर व 11.30 सलीम व्हॉट्सऍप ग्रुपचे प्रसाद गर्भे यांनी केले आहे.

 

नाशिकमध्ये घर घेण्याची इच्छा

 

रवी जन्नावार, नंदन दीक्षित हे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आर. जे. भूषण मटकरी यांची असून, या आठवणीतल्या चहासाठी रिदम साउंड, लाईट्स व इव्हेंट्स, गोदा श्रद्धा फाउंडेशन व द बलून.इन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Devyani Sonar

Recent Posts

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

6 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago