छत्रपती संभाजी राजे यांनी दिली भेट
लासलगाव:समीर पठाण
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जारंगे पाटील यांनी गेले दहा-बारा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.त्यांना समर्थन म्हणून नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मीक गंगाराम बोरगुडे यांनी आज सकाळी आठ वाजेपासून नैताळे येथेआमरण उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषण स्थळी छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन तुमच्या भावना शासनापर्यंत पाठवून समस्त मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे अमरण उपोषण करताना तुम्ही मात्र तब्येतीची काळजी घ्या असे आव्हान संभाजी राजे यांनी केले आहे.
सकाळी आठ वाजता नैताळे परिसरातील असंख्य तरुण आमरण उपोषण स्थळी जमा झाले.विविध प्रकारच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून उपोषणा सुरुवात करण्यात आली.यावेळी गावातील भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात उपोषण स्थळी भजन म्हणत आहे.यासाठी गावातील असंख्य तरुण उपोषणास बसले आहे.निफाड पोलीस स्टेशनचे पी आय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण स्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे