नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल बुधवार (दि.7)रोजी लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेच्या वतीने आणि अनिल सोनार लिखित आणि सुजय भालेराव दिग्दर्शित प्रतिकार हे नाटक सादर करण्यात आले.
समाजामध्ये प्रशासन व्यवस्था आणि वर्णव्यवस्था जेव्हा दुर्बल घटकांना दाबण्याचा प्रयत्न करते.अन्याय करते तेव्हा अन्यायाविरुद्ध विद्रोह केला जातो.प्रतिकार केला जातो त्यावर भाष्य करणार हे नाटक आहे. नाटकामध्ये जाधव नावाचा इन्स्पेक्टर त्याची असलेली राक्षसी प्रवृत्ती ,चळवळीतून नंतर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेला मोरे ,सोन्याच्या पिंजऱ्यात कैद पक्ष्यासारखी अवस्था असलेली बाईसाहेब ,कुलथेंच कुटूंब ,बनसोड गुरूजी ,वेडा यांच्या प्रतिकाराची ही कथा आहे.
नाटकात सिद्धांत मंगळे ,ज्योती चौहान,अभिजित कबाडे,हर्षल परदेसी,हर्षल मराठे,सागर चांगरे,जयेश देसले,स्वराज सावंत,केतकी पंचभाई,विकास वडिले, तन्मय बाविस्कर,रोहन बडगुजर,किर्तीवर्धन पानपाटील,प्रतीक वाघ,राजेश बिराडे , हितेश भामरे,आशिष कासार, प्रसाद पाटील,संजय विसपुते,विशाल महाले यांनी अभिनय केला आहे तर राहुल मंगळे प्रकाश योजना, संगीत संयोजन किरण जाधव,कुणाल शिंदे, नेपथ्य सुजय भालेराव,रंगभूषा रीना राजपूत , वेशभूषा शितल मराठे, रंगमंच व्यवस्था ओम कासार,मिहीर पाटील, मल्हार सापे,कुणाल खैरनार यांनी केले.
आज सादर होणारे नाटक : फेंट ,क्रांतीवीर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ