व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध  प्रतिकार

नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल बुधवार (दि.7)रोजी लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेच्या वतीने आणि अनिल सोनार लिखित आणि सुजय भालेराव दिग्दर्शित प्रतिकार हे नाटक सादर करण्यात आले.
समाजामध्ये प्रशासन व्यवस्था आणि वर्णव्यवस्था जेव्हा दुर्बल  घटकांना दाबण्याचा प्रयत्न करते.अन्याय करते तेव्हा अन्यायाविरुद्ध विद्रोह  केला  जातो.प्रतिकार केला जातो त्यावर भाष्य करणार हे नाटक आहे. नाटकामध्ये जाधव नावाचा इन्स्पेक्टर त्याची असलेली राक्षसी प्रवृत्ती ,चळवळीतून नंतर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेला मोरे ,सोन्याच्या पिंजऱ्यात कैद पक्ष्यासारखी अवस्था असलेली बाईसाहेब ,कुलथेंच कुटूंब ,बनसोड गुरूजी ,वेडा यांच्या प्रतिकाराची ही कथा आहे.
नाटकात  सिद्धांत मंगळे ,ज्योती चौहान,अभिजित कबाडे,हर्षल परदेसी,हर्षल मराठे,सागर चांगरे,जयेश देसले,स्वराज सावंत,केतकी पंचभाई,विकास वडिले, तन्मय बाविस्कर,रोहन बडगुजर,किर्तीवर्धन पानपाटील,प्रतीक वाघ,राजेश बिराडे , हितेश भामरे,आशिष कासार, प्रसाद पाटील,संजय विसपुते,विशाल महाले यांनी अभिनय केला आहे तर राहुल मंगळे प्रकाश योजना, संगीत संयोजन किरण जाधव,कुणाल शिंदे, नेपथ्य सुजय भालेराव,रंगभूषा रीना राजपूत , वेशभूषा शितल मराठे, रंगमंच व्यवस्था ओम कासार,मिहीर पाटील, मल्हार सापे,कुणाल खैरनार यांनी केले.
आज सादर होणारे नाटक : फेंट ,क्रांतीवीर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ
Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago