नाशिक : वार्ताहर रिक्षा प्रवासात चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . दागिने व रोकड चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या . याप्रकरणी प्राजक्ता वैभव सोनजे ( रा . महाराणा प्रताप चौक , सिडको ) यांनी फिर्याद दिली होती . प्राजक्ता या ४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी संभाजी चौक ते दत्त मंदिर स्टॉपदरम्यान रिक्षाने प्रवास करीत असताना २४ हजार ९ ६५ रुपयांचा मुद्देमाल दोन संशयित महिलांनी चोरून नेला होता . १५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारती गांगुर्डे ( रा . बनकर चौक , काठे गल्ली , व्दारका ) या कराड फरसाण , व्दारका येथून खडकाळी सिग्नलपर्यंत प्रवास करत होत्या . त्यांच्या पर्समधून ५० हजार रुपयांची चोरी झाली . या दोन्ही घटनांचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी दिले होते . पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे , सहायक निरीक्षक के . टी . रौंदळे , अंमलदार सोनार , टेमगर , पोलीस शिपाई आव्हाड , पानवळ , शेख , गुंजाळ , उगले , साळुंखे , महिला अंमलदार हिरवे यांनी शोध पथके नेमून दोघा संशयित महिलांना ताब्यात घेतले . शनिवारी ( दि . ७ ) महामार्ग बसस्थानकावर दोन संशयित महिला एका चारवर्षीय मुलासोबत परिसरात फिरताना आढळून आल्या . पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . संशयावरून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी प्रवासादरम्यान चोरी केल्याचे समोर आले . पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्यासाठी तक्रारदार महिला प्राजक्ता सोनजे व भारती गांगुर्डे यांना पोलीस ठाण्यात बोलावले . त्यावेळी महिलांनी दोघा संशयितांना ओळखले . या प्रकरणी मुंबई नाका पोलीस तपास करीत आहेत .
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…