सातपूर;-रिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना तसेच राज्य मंत्री मंडळाच्या विस्तार लोंढे यांच्या नावाची चर्चा व नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर लोंढे यांना अदन्यात व्यक्तींकडून धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोंढे हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आहेत. याप्रकरणी रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जगताप यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता. 29) रात्री 8 वाजेच्या सुमारास प्रकाश लोंढे यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांहून व्हाट्सअँप का़ल सह मोबाईल नंबर वर फोन आले. फोनकेलेल्या व्यक्तीने हिंदी भाषेत लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्यक्तीने राजस्थानमधून फोन केल्याचा संशय आहे. तसेच लोंढे यांना अशा प्रकारच्या धमकीचे फोन सात महिन्यात तिन फोन आले आहेत. आता चौथ्यांदा फोनद्वारे धमकी देण्यात आल्याचे प्रकाश लोंढे यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास करत आहे. सातपूर पोलीस स्टेशन करित आहेत