महाराष्ट्र

रिश्ते में धोका मत दिजीए, बारी अपनी भी आयेगी!

माझे दोन-तीन मित्र मला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मला तुमच्याशी खासगीत बोलायचं अस सांगतात तेव्हा मी विचार करू लागतो की, नेमकं काय बोलायचं असेल याला? मी म्हटलं ठीक आहे. भेटू या आणि एकेक मित्राला भेटलो आणि त्यांची कहाणी ऐकून मन सुन्न झाले!
खरंच असं का घडू लागलंय, दहामध्ये सहा घरांतली एकच कहाणी, सून ब्लॅकमेल करतेय, मुलगा व्यसनी आहे, त्याचे बाहेर काहीतरी आहे, घरातलं वातावरण ठीक नाहीये, रोज भांडणं चालू आहेत, सून मुलाला घेऊन वर्षभरातच वेगळी राहते आमच्याच घराजवळ दुसरे घर भाड्याने घेऊन, आई-वडिलांना भेटूच काय पण फोन पण करू देत नाही, नोकरीच्या बहाण्याने बाहेरच असते आणि तिच्याबद्दल काही खरं आहे ते सांगितले की आकांड-तांडव करते, आई मुलीची बाजू घेते, बाप मात्र मुलीचे चुकतेय हे सांगत असताना त्यालाही बाजूला करून सर्व घर त्याच्या विरोधात जाते. मुलीच्या आई -वडिलांकडचे आले की काय करू न काय करू असे होते आणि मुलाकडचे येणे तर सोडाच बोलणेही दुरापास्त असते हेच सर्वांचे ऐकून आपण कुठं चाललोत याचा विचार आता सर्व समाजाने नक्की करणे आवश्यक आहे. माझ्या एका मित्राच्या मुलाला विचारले, का रे तू आता नोकरीला लागलास, लग्न का करत नाही, तर त्याने दिलेलं उत्तर विचार करायला लावणारे आहे. काका, माझ्या तीन मित्रांनी लग्न केलं, पण एकाचीही बायको नांदत नाही म्हणून भीती वाटते. मी आई-वडिलांना एकटा आहे. जर असे झालं तर त्यांना किती दुःख होईल, याचाच विचार मी अजून करतोय. हे जर खरं असेल तर प्रत्येकाने मनाशी विचारलं पाहिजे की मुलगी आपल्याला जशी प्रिय असते तसा मुलगाही त्याच्या आई-वडिलांना प्रिय वाटत नसावा का? आहेत अशाही काही मुली नक्कीच आहेत की त्या सासू-सासर्‍याना आई-वडिलांसारखे वागवतात. नाही असे नाही पण त्यांची संख्या किती? आज 30-35 वय झालेल्या मुली आणि मुलं लग्नाशिवाय आहेत. याची कारणे कोणी समजावून घेणार आहे की नाही. याचं कारण म्हणजे आजूबाजूला असणारी घरं आणि त्यात चाललेली भांडणं. लोक खूप जपून चाललेली आहेत. सर्व काही असून मुलांची लग्न होत नाहीत. मोबाइलच्या सान्निध्यात जास्त काळ घालवणारी मुलं आणि मुली आजकाल वडीलधार्‍याशी उद्धट बोलू लागली आहेत. आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ लागल्याने आई-वडील अस्वस्थ झाली आहेत. मुलगी म्हणून खोटेनाटे आरोप करून मुलांना त्रास देणारी अनेक उदाहरणे समाजात आढळू लागली आहेत. विशेष म्हणजे आपल्याच घरात दोन प्रवाह दिसू लागली आहेत. स्वतःची मुलगी दुसर्‍या घरी असेल तर तिचे सर्व बरोबर आणि दुसर्‍याची मुलगी आपल्या घरात असेल तर ती चुकते हे सांगताना आपण आपल्या मनाशी विचारायला हवं की नेमकं बरोबर कोण? आई-वडिलांची मुलावर आशा असते की मुलं चांगले सांभाळतील, पण ती फोल ठरू लागली आहे. विशेष म्हणजे एकटा मुलगा असताना तो आई-वडिलांपासून दूर राहण्याचीच अनेक उदाहरणे समाजात दिसू लागली आहेत. नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणं समजू शकतो. मात्र, आई-वडील नकोत म्हणून बाजूला राहणं कितपत योग्य आहे हे प्रत्येक आई -बापाने मनाशी विचारलं पाहिजे. त्यांना प्रायव्हसी हवी आहे हा आजचा ट्रेंड! प्रायव्हसी नेमकी कोणती? पूर्वी एकत्र कुटुंब, पाच पंचवीस लोकांचा राबता, तरीही घर गुण्यागोविंदाने राहत असत. मग आज नेमकं काय घडतं की प्रायव्हसी मिळत नाही. विशेष म्हणजे आई जेव्हा प्रायव्हसी हवी त्यांना असे जेव्हा मुलीकडून बोलू लागते तेव्हा खरंच कीव करावीशी वाटते. घरात आता माणसंच इनमिन तीन-चार असतात. नवीन नवीन काही दिवस खूप आनंदात आहे असे वरवर दाखवले जाते आणि आतल्या आत मात्र बरंच वेगळं शिजू लागत असते. जी माणसं नाती जमवताना जमन्याआधीच खूप गोड बोलत असतात, तीच वर्षभरात एकमेकांची तोंडं पाहण्यासही तयार नसतात. असं आज बर्‍यापैकी चित्र सर्वत्र दिसतं. आमचे सोयरे खूप चांगले आहेत. खूप चांगली माणसं भेटली. जावई तर देवमाणूस, अशी लग्नाच्या आधी म्हणणारी माणसं त्यांनाच आता वाईट म्हणू लागलीत.वर्षभरात तर नेमकं काय समजायचंं? मुलीकडचे जास्त चिकित्सा करू लागलेत पण त्यांचाही मुलगा आहे हे मात्र ते सोयीस्कर विसरू लागले आहेत. छोट्या छोट्या बाबीवर लक्ष देणे आणि आमचंच नाणं कसं खरं हे सांगायला पुढे सरसावू लागली आहेत. भांडणाचे कारण फक्त आई-वडील जर असतील तर मग मुलं कुणापासून आलीत, त्यांनी उतारवयात नेमकं कुठं जायचं. हे एक मात्र खरं की वेगळी राहणारी जोडपी त्यांच्या घरात मूलबाळ जन्माला आलं की मग त्याला सांभाळायला मात्र मुलाच्या आई-वडिलांची आठवण काढू लागतात. आता ते पण कमी होऊ लागले. कारण मुलीची आई ही आता मुलीकडे सहज राहू लागली. त्यात काही वाईटही नाही. त्यांनी राहावंच पण मुलीला विचारावं की, बाई तुझी सासू का बोलावत नाहीस. पूर्वी मुलीला सांगितलं जायचं की आत्ता सासर हेच तुझं घर, तेच तुझे आईवडील, त्यांना सांभाळ हे आता का नाही होत मग तुम्ही आपल्या सुनेकडून अशी अपेक्षा कशी करू शकता? मुलांची लग्न न होण्याची ही तर काही कारण नसावीत न? मुलामुलींची वय वाढूनही लग्न न होण्याची ही कारणे कोणी विचारत घेणार आहे की नाही? आपला मुलगा, आपली मुलगी सर्वानी बाजू घेतली पाहिजे, पण नेमकं कोण चुकतंय हेही समजून घेतलं पाहिजे.
के.के. अहिरे

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

2 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

2 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

11 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

23 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago