मुंबई:
मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे नागराज मंजुळें यांच्या सैराट या सिनेमालाही मागे टाकले आहे. या सिनेमाने पहिल्या दहा दिवसात 12.10 कोटींची कमाई केली होती. आता ‘वेड’ या सिनेमाने हा रेकॉर्ड ब्रेक करत 33.42 कोटींची कमाई केली आहे.