लिलावानंतर मक्याचे दर कमी केल्याने शेतकरी संतप्त
बोलठाण : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील बोलठाण उपबाजारात मका लिलावात कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकर्यांनी उपबाजारासमोर रास्ता रोको केला. तब्बल दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.
बोलठाण उपबाजारात एका शेतकर्याच्या मका मालाची 1562 रुपये प्रतिक्विंटलने लिलाव केला; परंतु त्या शेतकर्याची प्रत्यक्षात 1520 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली. याप्रकरणी सदर शेतकर्याच्या नुकसानीला प्रशासन व व्यापारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. बोलठाण उपबाजार समितीसमोर शेतकर्यांनी तीव्र रास्ता रोको केला. तसेच कांदा दरही कोसळत सहाशेपेक्षाही दर कमी मिळाल्याने उपबाजारात अनेक कांदा उत्पादक शेतकरीही रास्ता रोकोत सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांनी मका व कांद्याच्या ट्रॅक्टरवर उभे राहून रास्ता रोको आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष जनार्दन भागवत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बोरसे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी पोलीस हवालदार भास्कर बस्ते यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. मंडळ अधिकारी भाऊसाहेब चौधरी यांनी उपस्थित राहून शेतकरी व व्यापारी यांच्यासह
सुसंवाद साधला. अखेर बाजार समिती संचालक गोकुळ कोठारी यांच्या मध्यस्थीतून शेतकर्याला मकाचे भाव (1600 रुपये प्रतिक्विंटल) वाढवून मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेतला. व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यासाठी गोकुळ कोठारी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या भूमिकेने तब्बल दोन तासांनी वाहतूक मार्ग सुरळीत झाला.
‘Roadblock’ in front of Bolthan sub-market
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…