मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न; मार्च 2027 अखेर रस्त्याचे काम होणार पूर्ण
लासलगाव : वार्ताहर
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी आणि वाहतुकीसाठी
महत्त्वाचा असलेल्या
लासलगाव ते पिंपळगाव या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निफाड, येवला, मनमाड, नांदगाव तालुक्यांतील नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांना पर्यायी मार्ग म्हणून लासलगाव व पिंपळगाव रस्त्याचे मजबुतीकरण करून रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या सुधारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
त्यासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येऊन मार्च 2027 अखेर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पिंपळगाव- पालखेड- लासलगाव हा 29 किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड व नांदगाव (मनमाड) तालुक्यांना जोडणारा
राज्यमार्ग आहे.
संबंधित रस्त्यावर पिंपळगाव व लासलगाव बाजार समिती आहे. तसेच लासलगाव व मनमाड रेल्वे स्टेशन आहे. या कामामुळे लासलगाव रेल्वे स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) जोडला जाणार असून, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनमाड, लासलगाव स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) यांना जोडणारा पर्यायी राज्यमार्ग आहे. तसेच हा रस्ता दिंडोरी तालुक्यातून त्र्यंबकेश्वरला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे.
लासलगाव शहरामधून गुजरात हद्द सावळदे, छडवेल, सटाणा, चांदवड, लासलगाव, विंचूर, सावळीविहीर (शिर्डी) रस्ता (रामा क्र. 7) हा जात असून, गुजरात राज्यातील शिर्डीला जाणार्या भाविकांची मोठी
वर्दळ असते.
तसेच सदर रस्त्यावर लासलगाव कांदा मार्केट असून, सिंहस्थ काळामध्ये कांदा वाहतुकीचा काळ असल्याने सदर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतकरी, प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार
लासलगाव ते पिंपळगाव हा रस्ता लासलगाव-कोटमगाव चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावपर्यंत 10 मीटर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून पुढे सारोळे खुर्दपर्यंत 7 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, तर सारोळे खुर्द ते लोणवाडीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे शेतकरी व इतर प्रवाशांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…