नाशिक

भोसला स्कूल परिसरात बिबट्याची अफवा

भीतीपोटी शाळेला सुट्टी; ड्रोनच्या सहाय्याने शोध

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा काल (दि.17) सकाळपासून सोशल मीडियावर सुरू होती. परिसरातील नागरिकांनीही दक्षता म्हणून वन विभागाला कळविले होते. यासंदर्भात माहिती मिळताच वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकासह गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात घनदाट झाडी व उंच गवत असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत होती. ड्रोनच्या सहाय्याने व्यापक तपासणी सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.
शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाशी चर्चा करून दुपारचे सत्र तत्काळ रद्द करण्यात आले होते. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता स्कूल व्हॅनच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. वन विभागाने राबविलेल्या शोधमोहिमेत कोणताही ठोस पुरावा अथवा बिबट्याचा वावर आढळलेला नाही. त्यामुळे दक्षता म्हणून वन विभागाचे पथक परिसरात सतत गस्त घालत आहे. शोधमोहीम सुरू ठेवली. संशयित ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेतील आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी शाळा प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली. परिसरातील वाढलेले दाट गवत व झाडी हटविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यासही शाळा प्रशासनाने सुरुवात केली आहे. रात्री वन विभागाच्या पथकांकडून थर्मल ड्रोनच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली जाणार आहे.

नागरिकांना आवाहन

वन विभागाने स्पष्ट केले की, परिसरात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कोणतीही माहिती तथ्य पडताळणी न करता सोशल मीडियावर अफवा स्वरूपात प्रसारित करू नये. कुठेही बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

7 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

7 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

7 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago