उमेदवारी अर्ज माघारी घेताना रुसवेफुसवे, संताप

दबाव, आर्थिक प्रलोभनाचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारी (दि. 2) शेवटचा दिवस असतानाच नाशिकच्या राजकीय वातावरणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. अनेक प्रभागांत उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. मात्र, या प्रक्रियेतूनच काही ठिकाणी मोठा गोंधळ व आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य उभे राहिले आहे.
प्रभाग क्रमांक 14 ’ड’मधून अपक्ष उमेदवार नंदू कहार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेण्याचा ठाम पवित्रा घेत खळबळजनक आरोप केले आहेत. नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडून आपल्यावर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप कहार यांनी केला आहे. शेवटच्या क्षणी आर्थिक प्रलोभन देऊन अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. कहार यांनी म्हटले की, प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपकडून एकही अधिकृत उमेदवार देण्यात आलेला नाही. आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करूनही आमचा विचार करण्यात आला नाही. त्यानंतर अचानक अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव व प्रलोभन देण्यात आले. मात्र, सामाजिक पाठबळ आणि मतदारांचा विश्वास असल्याने आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 14 ’क’मधून नंदू कहार यांच्या पत्नीने आपली उमेदवारी अर्ज माघारी घेत असून, हिंदू समाजाच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या या घडामोडींमुळे नाशिकमधील महापालिका निवडणुकीत राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

प्रभाग 14 ’क’मधून मी माघार घेतली असून, माझे पती यांची प्रभाग 14 ’ड’मधून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनाही माघार घेण्यासाठी भाग पाडले जात होते; परंतु आमच्याकडून माघार घेऊन इतर ज्यांनी कधी जनतेची कामे केली नाहीत, पैशाच्या जोरावर त्यांना उमेदवार उभा करण्याचा प्रकार सुरू असल्याने मी माझ्या पतीला उमेदवारी मागे न घेण्यास सांगितले. अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारण केले जात आहे.
– सोनाली कहार

Rumors, anger over withdrawal of candidacy

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *