बागलाण तालुक्यात विचित्र प्राणी आढळल्याची अफवा

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सटाणा : प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील आराईसह परिसरातील गावांमध्ये विचित्र प्राणी आढळल्याची सोशल मीडियावरील अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गुगलवरून डाउनलोड केलेले जुने फोटो आणि व्हिडूओ व्हायरल करून हा प्राणी महिलांवर हल्ला करतो, अशी खोटी माहिती प्रसारित करण्यात आली. प्रत्यक्षात अशी एकही घटना घडलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या अफवेमुळे बाहेरगावाहून आलेले शेतमजूर गावी परतू लागल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे.
तालुक्यातील विविध गावांच्या नावाने एकच संदेश वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल होत आहे. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी युवकांनी रात्री पहारा देण्यास सुरुवात केल्याचेही दिसले. या संदेशात विचित्र प्राणी महिलांवर हल्ला करून नरडीला चावा घेतो, असा अतिरंजित दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप अशा प्रकारची कोणतीही तक्रार किंवा जखमी महिला समोर आलेली नाही.
प्राथमिक चौकशीत हा व्हायरल फोटो 2020 मधील असून अमेरिकेत एका व्यक्तीने एलियनचा पोशाख परिधान करून केलेल्या चेष्टेचा असल्याचे समोर आले आहे. राजस्थानातील बिकानेर येथून तो फोटो पुन्हा व्हायरल करण्यात आला. त्याचे लोण महाराष्ट्रात पोहोचल्याचे सांगितले जाते. आराई येथे अफवेची माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी रात्री घटनास्थळी जाऊन शिवाराची पाहणी केली. कोणताही संशयास्पद प्राणी आढळला नसल्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी स्पष्ट केले. ‘जुने फोटो व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे. असे कृत्य करणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,‘ असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या दहशतीमुळे शेतशिवारात उघड्यावर वास्तव्यास असलेले बाहेरगावचे मजूर काम अर्धवट सोडून परत जाऊ लागले आहेत. परिणामी मजूर टंचाई निर्माण होऊन शेतीकामांवर परिणाम होत आहे. कोणीही अफवा पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरपंच दिलीप सोनवणे यांनी केले आहे.
सध्या प्रशासनाकडून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असून, अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी असा प्राणी जेथे आढळला तेथून तत्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा आणि तो प्रत्यक्षात दाखवा. अशा व्यक्तीला पाच लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डॉ. मनोहर सोनवणे, प्रा. शांताराम गुंजाळ, अरविंद सोनवणे, प्रा. अमोल बच्छाव यांच्यासह लालचंद सोनवणे, सुनील महाजन यांनी केले आहे.

Rumors of strange animals found in Baglan taluka

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago