सुखा मागे धावताना…! 

 

 

असं म्हणतात “आपला आनंद,सुख हे दुसऱ्यावर अवलंबून नसावं “….!

खरं आहे ना हे… “आपण कोणत्या न कोणत्या रूपात असे बरेच धडे दैनंदिन अनुभवातून रोज शिकत असतोच कि “…

सुखा मागे धावताना,, आनंद शोधतांना,, तो मिळतोच पण तो आनंद फार काळ टिकत नाही..! असं वाटतं ही आनंदी, सुखाची घडी कधी संपुच नाही… पण ती वेळ संपण्यासठीच असते.. त्या त्या वेळेची सुखाची किंमत दर्शवून जाते..

मग प्रसंग कौटुंबिक, लग्नसमारंभ,वाढदिवस,सहली,किंवा प्रेमळ क्षणही आनंद कुठलाही असो…!

“त्या प्रत्येक वेळेची सुखाची वेळ ही ठरलेली असतेच”… कारण तरच वेळेचं महत्त्व उरणार असतं…

” आनंद मुठीत पकडून ठेवता येत नसला..तरीही आठवण रुपाने हृदयात साठवता येतो ही ईश्वरी कृपाच”…

अशीच एकदा प्रेम सुखा मागे धावणारी एक मुलगी भेटली….नाराज होती,, उत्कंठ प्रेमात बुडालेली होती.. ते निस्वार्थ प्रेम होतं…!

तो मात्र अलिप्त होता.. बस् तीला सुखी बघावं,,,तिने मनाची चंचलता कमी करत स्थिर शांत जगावं ..तिने स्वतःला नेहमी आनंदी ठेवावं एवढीच त्याची अपेक्षा होती.. आणि तो सतत कामात व्यस्त रहात असे…!

तिला विचारले… तुला असं सतत विचाराने,मनाने ,कल्पनेने त्याच्या मागे धावून सुख आनंद मिळतो का ?

त्यावर ती छान हसली…आणि म्हणाली,,

“मी त्याच्या मागे काही मागण्यासाठी धावत नाही.. त्याला माझ्या प्रेमाच्या सावली ने जपत रहावं म्हणून काळजी घेते”…

“जमेन तसे,,वेळ मिळेन तसे बोलतं करते.. जास्त नाही पण सहवासाचे , संवादाचे चार क्षण मागते”… यातच माझा आनंद मला

गवसतो…या कल्पनेत सुख मिळतं …!

यावर काय बोलणार ना… शेवटी ज्याची त्याची सुखाची व्याख्याच वेगळी असते.

अशाच साठीतल्या एक आजी भेटल्या…

सतत काळजी चिंतेने चूर असलेल्या.. म्हटलं देवाच्या दयाने सर्व आहे तरीही का काळजी करतात …

आजी उत्तरली, “बाई सगळं ठिकाणी आहे.. पण डोळे मिळण्याआधी नातवंडाचंही नोकरी, रोजीरोटी, लग्न कार्य बघावं म्हणते”..

“खूप कष्टाने संसार इथवर ओढत आणलाय आता सगळे सेटल झालेले बघितलं का मगच जीवाला बरं वाटल माझ्या”…

घ्या.. आता काय बोलणार…!

मी म्हणते जीव गुंतवावा पण किती आणि कुठवर? मर्यादा ठरलेल्या असतात काही अपेक्षाच्या.. हे समजून घेतलं नाही तर दुःख दार ठोठवणारच ना? हाहाहा

आता असेच एकदा रिटायर मेंट झालेले काका भेटले, “रुबाब, सर्वत्र कडक स्वभावाचा दरारा असलेले काका नियमित फिरत असतात… तेव्हा संवाद साधला…

” काय काका कसे आहात मग”..

मुलांना सुनांना किंमत नसते रिटायरमेंट नंतर.. पैसा येणं बंद होतं ना.. रिकाम्या माणसाची अडचन होते घरात…असा खूप लोकांचा अनुभव आहे..

काका म्हणाले, ” पण मी शिस्तबद्ध ठेवलय घर…कुणी माझ्या शब्दा बाहेर जात नाही… यातच मला सुख वाटतं”…

“टाईमाटेबलाला थोडं ढिला सोडतो स्वभाव .. नाही तर मग सतत कडक बोलत राहीलं तर उतारवयात कुणी विचारत नाही.. प्रेमाने ही वागता यायला हवंच”.. हाहाहा..

हो हो बरोबरच.. पटलं मला…

बघितलं ना सुखामागे धावताना आपण पुर्णतः दुसऱ्याचाच विचार करत असतो… सुख स्वतःत शोधतच नाही… पण आपला आनंद हा आपल्यातच शोधला तर खरच सुखी होता येतं…

“जे आहे जेवढं आहे ते स्विकारले कि, आनंद सुख मानलं तर आहे, नाही मानलं नाही आहे…ही जाणीव आपोआप होते..!

 

©सविता दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *