राजीनामा स्वीकारण्याचे मनपाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
हायकोर्टाने अखेर ऋतुजा लटके यांना दिलासा दिला आहे. त्यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वीकारून तो मंजूर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. राजीनामा मंजूर होत नसल्याने लटके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे कोर्टाने पालिकेला बजावले. यानिर्णयाने ठाकरे गटालाही दिलासा मिळाला असून, आता त्या आज ठाकरे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.