‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी
एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च येथील एकूण 32 विद्यार्थ्यांना आरोग्य संशोधन विभाग व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून देण्यात येणारी एसटीआरजी शिष्यवृत्ती 48 विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर आणि डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील संशोधनातील टक्का वाढावा, जास्तीत जास्त विद्यार्थी संशोधनाकडे वळावेत तसेच त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा सामाजिक कार्यासाठी व्हावा, या उद्देशाने दरवर्षी आरोग्य संशोधन विभाग भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवत असते. संशोधन किंवा इनोव्हेशन यामध्ये आवड असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करतात. यावर्षी एसएमबीटीच्या पाच महाविद्यालयांच्या माध्यमातून अर्ज पाठविण्यात आले होते. त्यातून तब्बल 80 विद्यार्थ्यांची निवड या संशोधन शिष्यवृत्तीसाठी झाली. विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी पाठिलेल्या अर्जावर आयसीएमआरची एक समिती अर्जांचे मूल्यमापन करून निवड जाहीर करत असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह खासगी संस्थादेखील विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे प्रकल्प या शिष्यवृत्तीसाठी पाठवते. त्यामुळे एवढ्या
स्पर्धेतदेखील एसएमबीटीच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांचे 80 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यामुळे मानाचा तुरा खोवण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *