अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती मिळावी यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मसचेत’ हे अॅप सुरू करण्यात आले.
या अॅपच्या माध्यमातून मोबाइलवर एका क्लिकवर आपल्या शहरातील वातावरणाची अपडेट मिळणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्तीविषयी सूचना देणारे अॅप असून, ठराविक मिनिटांनंतर वापरकर्त्यांना माहिती देणारा संदेश प्राप्त होणार आहे. अॅप सुरू करण्यात येऊन दोन वर्षे झाली, तरी नागरिकांना अॅपसंदर्भात माहिती नसल्याने खूप कमी जण या अॅपचा वापर करतात.
ही बाब लक्षात घेत काही दिवसांपूर्वी झालेल्या ममन की बातफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी सचेत अॅपचा वापर करत वातावरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेत सतर्क राहावे, असेे आवाहन केेले होते.
सचेत अॅप स्मार्टफोनच्या जीपीएस लोकेशनचा वापर करून अलर्ट पाठवतो. अॅप वार्याचा वेग, पाऊस व तापमान यांचे सतत निरीक्षण करत असते. आपत्तीची शक्यता असल्यास सूचनांद्वारे तत्काळ अॅपवरून इशारा देण्यात येतो. सर्व सूचना अधिकृत सरकारी स्रोतांकडून येतात. जर आपत्ती आली असेल, तर त्या ठिकाणी काय करावे किंवा काय करू नये, याबद्दलची सर्व माहिती अॅपवर देण्यात येते. हे अॅप जीपीएस सिस्टिमवर कार्य करेल.
सचेत अॅपविषयी
Ο रियल टाइम लोकेशनच्या आधारे नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी अलर्ट पाठवून सावध करते.
Ο पूर, चक्रीवादळ, त्सुनामी, वादळ व वीज पडण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे अलर्ट.
Ο इंग्रजी, हिंदीसह प्रादेशिक भाषा अॅपमध्ये उपलब्ध.
Ο सचेत अॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध.
Ο मोफत माहिती देणारे अॅप.
Ο ऊन, पाऊस याविषयीचे सतर्कतेविषयीची अॅपवर माहिती.
Ο कोणत्याही मोबाइलवर अॅपची सुविधा उपलब्ध.
सर्वच नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप इन्स्टॉल करून घ्यायला हवे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकृत अॅप आहे.
अॅपवर मोफत वापरकर्त्यांना नैसर्गिक आपत्तीसह उष्णतेची लाट व
पावसासंदर्भात माहिती देणारे संदेश प्राप्त होणार आहेत.
अधिकृत अॅप असल्याने वापरकर्त्यांना खरी व वस्तुनिष्ठ माहितीच अॅपवर मिळणार आहे.
– श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी