अविनाश पाठक
गेल्या सुमारे सव्वा वर्षापासून देशभरात गाजत असलेल्या तीन प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी असलेला अटकेतील बडतर्ङ्ग पोलीस अधिकारी सचिन वाझे याला केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयाने माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी दिली आहे. या वृत्तामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडणे सहाजिकच होते. त्यानुसार राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या प्रकरणात राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेना या पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणार्या ‘सामना’ वृत्तपत्राने या निर्णयावर जबरदस्त टीका केली आहे. ‘सामना’च्या मते सचिन वाझे हा सीबीआयचा माङ्गीचा साक्षीदार नसून, भाजपचा माङ्गीचा साक्षीदार आहे. हा सचिन वाझे या प्रकरणात आधी
निर्दोष सुटेल आणि मग त्याला भाजपत प्रवेश देऊन पावनलेई घेतली जाईल, असाही कयास सामनाकारांनी व्यक्त केला आहे.
सध्या शिवसेना आणि सामनाने भाजपशी खुले वैर घेतले आहे. हे जगजाहीरच आहे. त्यामुळे सचिन वाझेला माङ्गीचा साक्षीदार बनवून भाजप त्याला मोठं करतो आहे आणि पुढे जाऊन त्याला भाजपमध्येच सहभागी करून घेतले जाईल, असा दावा शिवसेनेने करणे यात सकृतदर्शनी तरी वावगे काहीच नाही, नव्हे ती त्यांची गरजच आहे, असे म्हणता येईल. मात्र, भाजप सचिन वाझेला पावन करून घेतो आहे, असा आरोप करताना याच सचिन वाझेला आधी गोमूत्र शिंपडून शिवसेनेच पवित्र करून घेतले होते. हे ‘सामना’कार सोयीस्कररीत्या विसरतात. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे एक बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. हे सर्वसाधारण तत्त्व या प्रकारात तरी सामनाकार विसरले हे येथे नमूद करावेच लागते.
या विषयावर सविस्तर भाष्य करण्यापूर्वी सचिन वाझेचा इतिहास काय आणि माङ्गीचा साक्षीदार नेमके काय या दोन्ही रित्यांवर प्रकाश टाकणे गरजेचे वाटते. एखाद्या प्रकरणात आरोपी आणि गुन्हा कसा घडला, याबद्दलची माहिती पोलिसांकडे असते. मात्र, नेमके पुरावे मिळत नाही. अशावेळी अटकेतील जे संशयित आरोपी असतात त्यांच्यापैकी एखाद्या आरोपीला माङ्गीचा साक्षीदार बनवले जाते. हा माङ्गीचा साक्षीदार गुन्ह्यासंदर्भात समग्र माहिती तपासयंत्रणांना देतो. त्यातून निश्चित असे पुरावे उभे करणे शक्य होते. या पुराव्यांच्या आधारे तपासयंत्रणा गुन्ह्याच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात आणि खर्या आरोपींना शिक्षा केली जाऊ शकते. अशावेळी माङ्गीचा साक्षीदार बनवून तपास यंत्रणांना सहकार्य करणार्या आरोपीबाबत सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून त्याला प्रसंगी निर्दोष सोडले जाते किंवा जुजबी शिक्षा केली जाते. बर्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर साखळी खून खटल्यात एका आरोपीला असाच माङ्गीचा साक्षीदार बनवून पोलीस गुन्ह्याच्या शेवटापर्यंत पोहोचले होते. यात चार आरोपींना ङ्गाशीची शिक्षा झाली होती. तर माङ्गीचा साक्षीदार झालेला आरोपी
निर्दोष सुटला होता. या घटनाक्रमावर नंतरच्या काळात माङ्गीचा साक्षीदार हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. आता माङ्गीचा साक्षीदार बनलेल्या सचिन वाझेबद्दल सांगायचे झाल्यास हा महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी होता. 2005-06 च्या दरम्यान काही कथित गैरप्रकारांसाठी या सचिन वाझेला पोलीस दलाने निलंबित केले होते. आपले निलंबन रद्द करण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी झाले नाही. परिणामी, 2008-09 च्या दरम्यान सचिन वाझेने एका राजकीय नेत्याच्या भागीदारीत मुंबई परिसरात बांधकाम व्यवसायही सुरू केला होता. याच काळात सचिन वाझे हातावर शिवबंधन बांधून शिवसैनिकही बनला होता. यानिमित्ताने शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या तो बर्यापैकी जवळ सरकला होता. 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली. त्यावेळी दीर्घकाळापासून निलंबित असलेल्या सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात कामावर घ्यावे, यासाठी शिवसेना नेत्यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती मिळते. मात्र, सचिन वाझेविरुद्ध सुरू असलेली विभागीय चौकशी आणि विविध गुन्ह्यांसाठी त्याच्याविरोधात असलेले खटले या कारणामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला सहमती दिली नव्हती. 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आले. पाठोपाठ जगभरात कोरोनाची लाट आली. हे कारण दाखवत महाआघाडीतील शिवसेनेने सचिन वाझेला परत नोकरीत घ्यावे, असा आग्रह धरला. त्यानुसार जून 2020 मध्ये सचिन वाझेला परत नोकरीत घेण्यात आले. जवळपास 15 वर्षे निलंबित असलेल्या अधिकार्याला जेव्हा काही कारणाने नोकरीत परत घेतले जाते तेव्हा सुरुवातीला त्याला अकार्यकारी पदावर
नेमले जाते. पोलीस दलात तर 15 वर्षांपूर्वीचे प्रशिक्षण हा अधिकारी विसरला असे गृहीत धरून त्याला पुन्हा प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, या सर्व संकेतांना ङ्गाटा देत सचिन वाझे या पोलीस उपनिरीक्षकाला तातडीने जबाबदारीची कामे दिली गेली. त्यातही महाआघाडी सरकारला आणि त्यातल्या शिवसेनेला अडचणीत आणणार्यांविरुद्ध कारवाई करून अटक करण्याची जबाबदारी सचिन वाझेवरच होती. वृत्तवाहिनी पत्रकार अरनब गोस्वामीला अटक करून तुरुंगात डांबून ठेवण्याचे काम सचिन वाझेनेच केले होते. इतरही अनेक महत्त्वाची कामे त्याच्यावर सोपवली होती.
मार्च 2021 च्या दरम्यान देशातील आघाडीचे उद्योगपती रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर एका कारमध्ये स्ङ्गोटके सापडली. या घटनेने उभा महाराष्ट्र हादरला. या घटनेची चौकशी देखील सचिन वाझेकडेच सोपवली होती. नंतर या प्रकरणाशी चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरू केल्यावर या प्रकरणातील सूत्रधारच सचिन वाझे होते हे समोर आले. या प्रकरणात ज्या गाडीत स्ङ्गोटके होती ती गाडी मनसुख हिरेन नावाच्या ठाण्याच्या उद्योगपतीची होती हे उघडकीला आले. हे उघडकीला आल्यावर थोड्या दिवसांत मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मुंबईजवळ एका खाडीत सापडला होता. चौकशीनंतर अंबानींच्या बंगल्यासमोर स्ङ्गोटके ठेवणे आणि मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू या दोन्हींमध्ये सचिन वाझेचाच हात असल्याचे समोर आले. परिणामी, केंद्रीय तपासयंत्रणांनी त्याला अटक केली. सुमारे वर्षभरापासून तो अटकेत आहे. दरम्यान, त्याला सेवेतून बडतर्ङ्ग करण्यात आले आहे.
सचिन वाझे तुरुंगात गेल्यावर मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी आणखी एक बॉम्ब टाकला. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईच्या सर्व
बारमालकांकडून दरमहा शंभर कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे काम सचिन वाझेकडे दिले होते आणि सचिन वाझे हा पार पाडत होता, असा आरोप पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला. या प्रकरणात अनिल देशमुखांचे मंत्रिपद तर गेलेच आणि त्यांना तुरुंगातही जावे लागले.
हे सर्व प्रकार लक्षात घेतले तर सचिन वाझे हा एकूण तीन प्रमुख प्रकरणामध्ये संशयित आरोपी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यातील एका प्रकरणात त्याला माङ्गीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याला माङ्गीचा साक्षीदार केल्याबरोबर शिवसेनेच्या पोटात जोरदार पोटशूळ उठला असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळेच शिवसेनेने टीका करताना त्यांच्या सवयीनुसार या प्रकरणात भाजपला गुंतवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केलेला दिसून येतो आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात वाझे हा केंद्रीय तपास यंत्रणाचा तर भाजपचा माङ्गीचा साक्षीदार आहे. इथे ‘सामना’कार सोयीस्कररीत्या विसरतात की याच सचिन वाझेविरुद्धचे शुक्लकाष्ट रद्द ठरवून त्याला सन्मानाने नोकरीत घेतले जावे यासाठी शिवसेनेचे प्रयत्न केले होते. शिवसेनेच्याच पुढाकाराने 2020 मध्ये वाझे नोकरीत परत रुजू झाले. त्यांच्याच कृपाप्रसादाने सर्व संकेत दूर सारत वाझेंना कार्यकारी जबाबदारी देण्यात आली होती. सत्ता नसताना याच वाझेला शिवसेनेने शिवबंधनही बांधले होते. मुख्यमंत्री ङ्गडणवीसांच्या काळात या वाझेला परत नोकरीत घ्यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनीच प्रयत्न केले होते. ज्यावेळी अंबानींच्या घरासमोरील स्ङ्गोटकांचे प्रकरण पुढे आले त्यावेळी विधिमंडळात सचिन वाझेचा बचाव करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिन वाझे म्हणजे दाऊद आहे काय, असा प्रश्नही विचारला होता. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर गुन्हा समोर येण्यापूर्वीच शिवसेनेने सचिन वाझेला माङ्गीचा साक्षीदार बनवून ठेवले होते हे स्पष्ट दिसून येते. तरीही आपल्याकडे तीन बोटे आहेत हे विसरून भाजपवर आरोप करायचे ही जुनीच स्टाईल शिवसेनेने इथे वापरली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तीनही गुन्हे लक्षात घेता एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी अंबानींच्या घरासमोर स्ङ्गोटके ठेवणे, त्यासाठी चोरीची गाडी आणणे त्या गाडीमालकाचा काटा काढणे आणि मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटींची वसुली करणे हे काम स्वतःहून करेल असे वाटत नाही. या व्यक्तीच्या मागे कोणतीतरी जबरदस्त शक्ती उभी असल्याशिवाय हे काम त्याने करणे शक्य नाही. ही शक्ती एकतर राजकीय किंवा उद्योग क्षेत्रातीलच असू शकते. मात्र, अशी शक्ती स्वतः समोर न येता सचिन वाझेसारखा एखादा मोहरा समोर करून अशी कामे करवून घेत असते. या प्रकारातही तसेच घडले असल्याची शक्यता नव्हे तर खात्री आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता सचिन वाझे माङ्गीचा साक्षीदार झाल्यास या सर्व
घटनांमधील कटाचा सूत्रधार कोण हे सर्व येण्याची शक्यता वाढली आहे. किंबहुना हा सूत्रधार शोधण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी सचिन वाझेंना माङ्गीचा साक्षीदार बनवले आहे. सचिन वाझे माङ्गीचा साक्षीदार झाला तर त्याच्याकडून मिळणार्या माहितीच्या आधारे या कटामागे कोण कोण सूत्रधार आहे ते समोर येईल आणि खोटे मुखवटे धारण करणार्यांचे बुरखे ङ्गाडले जातील हे नक्की.
शिवसेनेला नेमकी हीच भीती वाटत असावी हे निश्चित. त्यामुळेच शिवसेनेने या प्रकरणात ओरड सुरू केली आहे आणि त्याच्या नेहमीच्या स्टाईलनुसार भाजपवर टीका करणे सुरू केले आहे. या टीकेतून काही ङ्गारसे साधेल असे दिसत नाही. सचिन वाझेंने माङ्गीचा साक्षीदार बनण्याची तयारी केली. त्यातून खरी माहिती समोर येण्याची शक्यता बरीच वाढली आहे. यामुळे खरे सूत्रधार समोर येऊ शकतात. या सूत्रधारांशी शिवसेनेचे हितसंबंध गुंतले असल्यामुळेच शिवसेना अशाप्रकारे टीका करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यात किती सत्य आहे आणि किती तथ्य आहे हे यथावकास समोर येईलच.