शहरात भगवे वादळ


नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसावर आली आहे. शहरात विविध राजकीय पक्ष आणि शिवजन्मोत्सव समितीकडून शिवजयंती जोरदार पूर्वतयारी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या तयारीसाठी शहरातील बाजारपेठेत भगवे झेंडे, अर्धाकृती पुतळे, महाराजांचे फोटो महाराजांची प्रतिमा असलेले बॅच विक्रीसाठी आले आहेत. विविध आकाराचे झेंडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. विविध आकारानुसार 30 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे झेंडे विक्रीसाठी आहेत. झेंड्यामध्ये अनेक प्रकार असून छत्रपती शिवरायांचा फोटो असलेल्या झेंड्यास सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये छत्रपतींचा फोटो असलेले झेंडे, जाणता राजा झेंडा, स्केच असलेला झेंडा आदी प्रकारचे झेंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवजयंती निमित्त बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमासाठी शिवप्रेमींकडून झेंड्यांची खरेदी केली जाते. दुचाकीसह ,चारचाकीवर भगवे झेंडे लावण्यात येतात. प्रत्येक शिवप्रेमी आपल्या घरावर शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह आहे. शिवजयंतीच्या आगोदरपासून शिवप्रेमी आपल्या घरावर, चारचाकी, दुचाकी वाहनांवर मोठ्या अभिमानाने शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध ठिकाणांहून मोटारसायकल रॅली , चारचाकी वाहनफेरी काढण्यात येते, या वाहनांवर झेंडे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेंडे खरेदी करण्यात येत आहेत.


असे आहेत दर
झेंडा -50 -800 रू
बॅच – 30 -50 रू.
झेंड्यासाठी लागणारी काठी -80 -ते100 रू.

यंदा झेंड्याना अधिक मागणी आहे. त्याचप्रमाणे 20 ते 30 टक्कयांने दरही वाढले आहेत. वीर शिवाजी,जानता राजा झेंड्यांना अधिक पसंती मिळत आहेत.
किशोर शिरोरे, विक्रेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *