सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्यास अटक

लासलगाव :  प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गणेश सुकदेव नागरे राहणार पाचोरे ता.निफाड तसेच आकाश रामनाथ यादव रा.शिरवाडे ता.निफाड यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भारतीय सैन्य दलातील तोतया लोकसेवक भासविणाऱ्या बापू छबू आव्हाड रा.आंबेगाव ता.येवला याच्या विरुद्ध लष्करी गुप्त वार्ता विभाग व लासलगाव पोलीसांनी कारवाई केली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव ता.येवला येथील बापू छबू आव्हाड याने
भारतीय सैन्य दलातील सैनिकांचा गणवेश घालून व खोटे ओळखपत्र दाखवून सैन्य दलातील सरकारी लोकसेवक असल्याचे भासवुन भारतीय सैन्य दलात नोकरीस लावून देतो अशी खोटी बतावणी करून आंबेगाव येथील गणेश सुकदेव नागरे तसेच आकाश रामनाथ यादव रा.शिरवाडे ता.निफाड या दोघांची मिळून ११ लाख २० हजाराची आर्थीक फसवणूक केली आहे.

या घटनेतील फिर्यादी गणेश सुकदेव नागरे तसेच त्यांचा मित्र आकाश रामनाथ यादव रा.शिरवाडे ता.निफाड यांनी आरोपींच्या सांगण्यावरून वेळोवेळी आरोपींच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने ११ लाख २० हजार रुपये फोन पे द्वारे पाठवले होते.मात्र एवढे पैसे दिल्यानंतर देखील फिर्यादी चे आर्मीमध्ये जॉईनिंगचे काम होत नसल्याने फिर्यादीने या बाबत आरोपीस वारंवार विचारना केली असता आरोपीने फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व नंतर फिर्यादीचे फोन उचलले नाही या वरून फिर्यादीला व त्यांच्या मित्राला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी व त्याचा मित्र आकाश रामनाथ यादव यांनी मिलटरी इटेलिजिन्स दक्षिण कमांड,पुणे येथे बापु छबु आव्हाड व त्याचे साथीदार सत्यजीत भरत कांबळे,राहुल सुमंत गुरव,विशाल सुरेश बाबर यांनी पैसे घेऊन आमची फसवणुक केल्याची तक्रार फोनद्वारे केली होती. या वरून लासलगाव पोलिस ठाण्यात बापु छबु आव्हाड व या गुन्ह्यात त्याला साथ देणारे त्याचे साथीदार सत्यजीत भरत कांबळे,राहुल सुमंत गुरव,विशाल सुरेश बाबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी बापु छबु आव्हाड यास निफाड न्यायालयात हजर करण्यात आले आहे.या घटनेतील पुढील तपास लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठूळे व पोलिस कर्मचारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *