मनमाडला संभाजी भिडे यांना दाखवले काळे झेंडे
मनमाड : आमिन शेख
कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना मनमाड येथे काळे झेंडे दाखवण्यात आले मनमाड मार्गे धुळे येथे कार्यक्रमाला जात असताना मनमाड येथे भिमसैनिकांनी संभाजी भिडेला काळे झेंडे दाखवले यावेळी भिडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पोलिसांनी आंदोलन कर्त्याना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन कर्त्यानी ऐकले नाही व जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली.
महाराष्ट्रभर बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनोहर कुलकर्णी अर्थात सँभाजी भिडे यांना काल मनमाड शहरात काळे झेंडे दाखवून व त्यांचा ताफा अडवून निषेध करण्यात आला.यावेळी संभाजी भिडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर मोठ्या प्रमाणावर वातावरण तापले होते.मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे गुरुजी हे नियोजित दौऱ्यावर होते येवला येथे कार्यक्रम आटोपून ते मनमाड मार्गे धुळ्याकडे जाणार होते यावेळी मनमाड येथील अयोध्या नगर येथे झालटे वस्तीवर त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी देखील घेतेली नव्हती तरी रात्री 10 च्या नंतर हा कार्यक्रम घेण्यात आला मात्र हा कार्यक्रम आटोपून पुणे इंदुर मार्गाने भिडेचा ताफा मालेगाव कडे जात असताना शहरातील पाकिजा कॉर्नर या ठिकाणी भिम सैनिकांनी हा ताफा अडवला हो काळे झेंडे पोस्टर दाखवुन निषेध केला यावेळी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यानी त्यांचा ताफा अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी वातावरण तापले होते.
भिडे व आयोजकावर गुन्हा दाखल..!
यावेळी आंदोलन कर्ते स्वतः पोलीस ठाण्यात गेले व आम्ही निषेध केला आहे आम्हाला नोटिसा द्या मात्र संभाजी भिडेने आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली तसेच विनापरवाना कार्यक्रम कसा घेण्यात आला याचे उत्तर द्यावे आमच्यावर केला तसा या दोघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली यामुळे पोलीस देखील हतबल झाले पहाटे तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून गुन्हा दाखल करून घेतला.