नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिकरोड :  प्रतिनिधी
अमरावती येथील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी शिर्डीचे साईबाबा तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल अपशब्द काढले होते. दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते संतोष गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे सुद्धा दाखल झाले आहे. या प्रकारानंतर नाशिकरोड मध्ये संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नाशिकरोड पोलिसांना  भेटले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, सुधाकर जाधव, शंकर मंडलिक, संतोष गाडेकर, विशाल गाडेकर, केशव पोरजे, भैय्या मनियार, विकास गीते, पुरुषोत्तम फुलसुंदर, भारत जेजुरकर, किशोर अहिरे, प्रशांत जेजुरकर,  सागर महाजन सुनील गांगुर्डे आदींनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्य पोलीस आयुक्त आनंद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची भेट घेऊन शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी नाशिक रोड पोलिसांनी मान्य केली . त्यानंतर संतोष गाडेकर यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा प्रकार अमरावती येथे घडला असल्याने हा गुन्हा अमरावती पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *