समीर भुजबळ यांची मनमाड शहरातून भव्य प्रचार रॅली

समीर भुजबळ यांची मनमाड शहरातून भव्य प्रचार रॅली

मनमाडकरांचा कौल भुजबळ यांनाच असल्याची जोरदार चर्चा

मनमाड : प्रतिनिधी

‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ अशी घोषणा देऊन मैदानात उतरलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. भुजबळ यांची निशाणी असलेल्या शिट्ट्यांच्या आवाजाने मनमाड परिसर दुमदुमुन गेला. तसेच, या भव्य रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या रॅलीमुळे मनमाडकरांचा कौल भुजबळ यांनाच असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ शहरात रविवारी (१० नोव्हेंबर) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रॅली पुढे मार्गस्थ होऊन एकात्मता चौक, नुक्कड पान स्टॉल चौकातून पुढे आली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भाग्यलक्ष्मी बँकेसमोरून रॅली महालक्ष्मी चौकातून पुढे गेली. याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. पुढे महालक्ष्मी चौक-तेली गल्ली-नीलमणी गणेश मंदिर येथे रॅली आली. गणेश मंदिरात भुजबळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर सराफ बाजार, सरदार पटेल रोड हून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इंडियन हायस्कूल रस्त्याने दादासाहेब गायकवाड चौक, बावन नंबर येथे रॅली पोहचून क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून महात्मा फुले पुतळा, भगतसिंग मैदान रस्ता, नेहरू भवन चौक, सुभाष रोड मार्गे जैन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारत जनरल स्टोअर रस्त्याने राम मंदिरकडे रॅली मार्गस्थ झाली. सर्वात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तुफान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.मनमाड शहरातून निघालेल्या प्रचार रॅलीत दीपक गोगड, रवींद्र घोडेस्वार, दिलीप नरवडे, संजय निकम, संजय भालेराव, पी आर निळे, मानेकर बाबूजी, सुशील खरे, कैलास अहिरे, वंदेश गांगुर्डे, सचिन संसारे, तौफिक खान, निलेश मानेकर, अमोल गांगुर्डे, दीपक धीवर, प्रमोद जगताप, विष्णू पवार, भागवत मोरे, रमेश भालेराव, जिल्हा अध्यक्ष योगिता पाटील, दीक्षा कडलक, तालुका अध्यक्ष अपर्णा देशमुख, कोमल निकाळे, माया झाल्टे, शहर उपप्रमुख बागुल, सुरेखा चव्हाण, अनिता संसारे यांच्यासहित हजारो जनसमुदाय या रॅलीत सहभागी झाला.

प्रचंड जनसमुदाय

या रॅलीत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता. महिला वर्गाची संख्या मोठी होती. त्याचबरोबर अबालवृद्धांनी ‘प्रगत नांदगाव, भयमुक्त नांदगाव, चा नारा देत रॅलीत एकच गर्जना केली.
ढोल ताशांच्या तालावर ठेका
रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. याठिकाणी समीर भुजबळ  यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ, योगिता पाटील, दीक्षा कडलक, अपर्णा देशमुख आदींनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. याचवेळी अनेकांनीही नाचून आपला आनंद द्विगुणीत केला.

*आव्वाज भुजबळांचाच…*

मिरवणूक मार्गात ढोल ताशा आणि झांझरियाच्या तालावर रंगत वाढत होती. त्याचवेळी बाजारातून जाणारे नागरिकही कौतुकाने “आव्वाज भुजबळांचाच” असे बोलत होते. आजूबाजूला शिट्ट्यांचा आवाज येत असल्याने ही भुजबळांची रॅली असल्याच चर्चा रंगली होती.
निळी टोपी आणि मफलर
प्रचार रॅलीत अपक्ष उमेदवार मा. खा. समीर भुजबळ यांनी निळी टोपी आणि निळी मफलर परिधान केली होती. अशाच प्रकारे असंख्य कार्यकर्ते निळ्या रंगातच जणू दिसत होते. या रॅलीत ‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ ही टॅगलाईन असलेली मफलर आकर्षण ठरत होती.
ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत
उमेदवार समीर भुजबळ यांचे ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात येत होते. काही ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जात होता. तर काही ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित केले जात होते. तसेच, रॅली मार्गात फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. त्यामुळे आज जणू दिवाळीचाच सण आहे की काय, अशी अनुभूती शहरवासियांना येत होती.

पारडे जड झाल्याची चर्चा

शहरातून भव्य प्रचार रॅली निघाली, या रॅलीत शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले, उत्स्फुर्तपणे भुजबळ यांचे स्वागत झाले, सर्वधर्मीय आणि विविध समाजघटकांकडून त्यांना पुष्पगुच्छ दिला जात होता. त्यामुळे ही बाब लक्षणीय ठरली. परिणामी, नांदगाव मतदारसंघात भुजबळ यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

4 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

12 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago