राज्य शासनाचा नवा निर्णय जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाने रेती वाहतुकीसंदर्भात नवीन निर्णय जाहीर केला असून, रेती वाहतुकीस 24 तास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र खनिज उत्खनन विकास व नियमन अधिनियम 2013 अंतर्गत व त्यास अनुसरून जारी केलेल्या अधिसूचना व धोरणानुसार, सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच रेतीचे उत्खनन बंधनकारक असले तरी, उत्खनन केल्यानंतर वाहतूक मात्र आता रात्रभर करता येणार आहे. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करत अनेक अटी व शर्तींच्या अधीन राहून ही सवलत लागू केली आहे. दिवसा वाहतुकीच्या ताणामुळे अनेक ठिकाणी रेती वाहतूक सायंकाळी किंवा रात्री करण्याची गरज उद्भवत होती. याशिवाय, जलसंपदा किंवा इतर पायाभूत प्रकल्पांच्या वेळेत पूर्ततेसाठीही ही वाहतूक आवश्यक ठरत होती. तसेच परराज्यातून येणार्या रेती वाहतुकीला पूर्वीपासून 24 तास परवानगी असल्यामुळे राज्यांतर्गत वाहतूकदारांमध्ये असमतोल निर्माण झाला होता. नवीन निर्णयामुळे हा तिढा सुटणार असून, वाहतुकीचा कार्यक्षम उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रेती उत्खननाच्या वेळेला बंधन राहणार असले, तरी वाहतुकीसाठी आता सुविधा आणि लवचिकता उपलब्ध झाली आहे. मात्र, जीपीएस, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक अटींचे काटेकोर पालन करणे भाग आहे. प्रशासन आणि वाहतूकदार यांच्यातील समन्वयामुळेच या निर्णयाचा लाभ प्रत्यक्षात दिसून येईल.
निर्णयासंबंधी मार्गदर्शक सूचना
4उत्खनन वेळेत काढलेली रेती स्वतंत्र ॠशे-ऋशपलळपस केलेल्या ठिकाणी साठवणे बंधनकारक. 4सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान उत्खनन क्षेत्रात वाहनांची ये-जा पूर्णतः बंद. वाहने अखड-140 खठछडड प्रमाणित जीपीएस डिव्हाइसेस असलेली असावी.4रेती साठवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य, त्याचे रेकॉर्डिंग दर 15 दिवसांनी तहसीलदार कार्यालयात सादर करणे बंधनकारक.4वाहतुकीसाठी केवळ वैध शढझ असणे आवश्यक; मुदत संपल्यानंतरची वाहतूक बेकायदेशीर समजली जाईल.
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…
प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…
एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…