नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नाशिक येथील संगीता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी िदले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबई प्रदेश कार्यालयात दि. १८ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संगीता अरुण पाटील यांची नाशिक महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिलाध्यक्षा श्रीमती फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
संगीता पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढण्याबराेबर यापूर्वी केलेल्या आंदोलनामधील सहभाग तसेच सर्वसामान्यांना वेळोवेळी केलेली मदत तसेच कोरोना काळात त्यांनी अनेकांना सर्वतोपरी सहकार्य केले आहे. या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
या निवडीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार, नाशिक पश्चिम विभागीय अध्यक्षा योगिता पाटील, नाशिक महिला शहराध्यक्षा अनिता दामले, मीरा भोईर, गोकुळ पिंगळे, दत्तात्रेय माळोदे, वसंतराव ठाकरे, सोमनाथ भिसे, संगिता सुराणा, आरती सुपेकर, स्नेहा यादव यांनी अभिनंदन केले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…