संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा ”
मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर
पंचवटी : सुनील बुणगे
कोकणात काही भागात संवेदनशील परिस्थिती असतानाही लोकसभा निवडणुकीत चोख पोलिस बंदोबस्त तसेच नाशिक ग्रामीणचे अधीक्षक असताना उत्तर प्रदेशातून येणारा बंदुकींचा अवैध शस्त्रसाठा जप्त करून, तब्बल ४४ बंदुका आणि तीन हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती.अशा अनेक धडक कारवायांची दखल केंद्र सरकारने दखल घेत भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले मखमलाबाद गावचे भूमिपुत्र कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या कामाची दखल केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून त्यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
मूळचे मखमलाबाद गावचे भूमिपुत्र असलेले संजय भास्कर दराडे हे २००५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील प्रेस कामगार असलेले भास्कर दराडे यांना तीन मुलं त्यातील संजय हे मोठे तर दिलीप आणि शरद मुल आहेत.यातील दिलीप हे प्रादेशिक परिवहन विभागात मोटर वाहन निरीक्षक तर शरद हेही आयपीएस आहेत. संजय दराडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मखमलाबाद गावात झाले.त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नाशिक मध्ये झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी काळ कंपनीमध्ये काम करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आपल ध्येय निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले. अतिशय मेहनत करून त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.
त्यांनी धाराशिव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. धाराशिव मध्य पोलीस अधीक्षक असताना तुळजाभवानी नवरात्र बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडला. तर २०१४ च्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडली होती .२०१५ साली नाशिक मध्ये झालेल्या कुंभमेळ्या दरम्यान कुंभमेळ्याचा बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल केल्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कौतुकाचे पत्र दिले आहे .त्यानंतर २०१७ मध्ये नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना संजय दराडेंनी उत्तर प्रदेशातून येणारा बंदुकींचा अवैध शस्त्रसाठा जप्त करून, तब्बल ४४ बंदुका आणि तीन हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती. त्यांची ही अत्यंत संवेदनशील आणि मोठी धडाकेबाज कारवाई होती. या कारवाईची अवघ्या महाराष्ट्रासह भारतभर चर्चेचा विषय ठरली होती.
त्यांनी पूर्व प्रादेशिक अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून संवेदनशील पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम केले. त्यानंतर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची जबाबदारी आली. संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक पोलिस ठाण्यात जाऊन स्वतः भेटी दिल्या . त्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केल . विशेषतः महिलांवरील अत्याचारांबाबत असलेल्या तक्रारींवर २४ तासांच्या आत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात काही हत्या प्रकरण घडली आहेत. या हत्या प्रकरणातही संबंधित आरोपीला निष्पन्न करून कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाई ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे.
चौकट
सायबर क्राईमच्या विरोधात सोशल लॅब सुरू करणार
येणाऱ्या काळात लवकरच कोकण परिक्षेत्रात जिल्हा पोलीस ठाण्यांमध्ये अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच या सोशल सायबर क्राईमच्या विरोधात सोशल लॅब सक्रिय होणार आहे.
संजय दराडे
विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण विभाग
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन मुंबई: ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायाधीश आणि साहीत्य संमेलन माजी…
प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींचे महानिर्वाण नाशिक | जैन धर्मियांचे विद्यमान गच्छाधीपती संघनायक व सुमारे…
नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती गिरीश महाजन, तटकरेंना मोठा धक्का मुंबई : राज्य सरकारकडून शनिवारी (दि.19)…
नाशिक: प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या नाशिक च्या पालकमंत्री पदावर अखेर गिरीश महाजन यांच्याच…