संजय राऊत यांच्या घरी इडीची धाड
मुंबई: पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी इंडी च्या पथकाने आज सकाळीच खासदार संजय राऊत यांच्या घरी धडकले, सकाळी 7 वाजता हे पथक दाखल झाले, यावेळी पथकाने संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली, संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते, या कारवाई मुळे संजय राऊत यांनी ट्वीट करत मी हटणार नाही, शरण जाणार नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतो अशा प्रकारचे ट्वीट केले,
संजय राऊत यांच्या कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहे, संजय राऊत यांना कदाचित अटक होण्याची शक्यता असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, संजय राऊत यांच्या कारवाईमुळे शिंदे गटाने आनंद व्यक्त केला तर किरीट सोमय्या यांनी हिसाब तो देना पडे गा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली,