संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

मुंबई: पत्राचाळ प्रकरणी अखेर खासदार संजय राऊत यांना ईडीने मध्यरात्री अटक केली, काल सकाळीच ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी धडक दिली होती, 9 तास झाडाझडती घेतल्यावर त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात घेऊन गेले होते,  ईडी  कार्यालयात
सात तास करण्यात आलेल्या चौकशीनंतर मध्यरात्री खासदार  संजय राऊत यांना मध्यरात्री  अटक करण्यात आली.

संजय राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीच्या पथकाने काल सकाळीच  त्यांच्या घरी धडक दिली होती, संजय राऊत यांच्या तीन ठिकाणच्या मालमत्ताची चौकशी करण्यासाठी काल सकाळी 7 वाजता हे पथक दाखल झाले, यावेळी पथकाने संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली, संजय राऊत यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले होते, या कारवाई मुळे संजय राऊत यांनी ट्वीट करत मी हटणार नाहीश्य जाणार नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतो अशा प्रकारचे ट्वीट केले होते. तसेच ईडी कार्यालयात जात असतानाही दोन वेळा पत्रकारांशी संवाद साधला होता.
संजय राऊत यांच्यावरील  कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, संजय राऊत यांच्या कारवाईमुळे शिंदे गटाने आनंद व्यक्त केला तर किरीट सोमय्या यांनी हिसाब तो देना पडे गा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, ईडी ने संजय राऊत यांच्या घरातून साडे अकरा लाखांची रोकड जप्त केली, त्यातील दहा लाख पक्षाचे असल्याचं सांगितले जाते, आज सकाळी त्यांना जें जे रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल, त्यानंतर ईडी न्यायालयात हजर करून त्यांची कोठडी मागण्यात येईल,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *