मालेगाव: प्रतिनिधी
पालकमंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना मालेगांव न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे, राऊत यांच्या विरोधात दाखल फौजदारी खटल्यासंदर्भात शनिवार दि.४ रोजी हजर राहण्याचे निर्देश मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी दिले होते.परंतु खा. राऊत न्यायालयात गैरहजर राहिले. यामुळें दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकुण न्यायलयाने रक्कम रु ५०००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट (बेलेबल वॉरंट) जारी केले आहे.
खा.राउत वतीने वकीलांनी दिलेल्या अर्जात मराठा आरक्षण आंदोलनामुळे पुढा-यांना असलेली गावबंदी, व आंदोलनाचे कार्यकत्यांच्या असंतोषाला राजकिय पक्षाचे नेतेमंडळींना सामोरे जावे लागत आहे व अनेक ठिकाणी हिंसक स्वरूप प्राप्त झाले व मालेगांव न्यायालयात हजर राहण्यासाठी आल्यास आंदोलक कार्यकत्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल अशा आशयाचा अर्ज खा. संजय राऊत यांच्या पत्रावरुन त्यांच्या वकीलांनी न्यायालयात दिला.
या अर्जाला मंत्री दादा भुसे यांचे वकील ॲड. सूधीर अक्कर यांनी सक्त लेखी हरकत घेतली तुर्तास मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले असून सध्या कोणत्याही प्रकारे मालेगांव येथे कोणतेही आंदोलन नाही व खा. संजय राऊत साहेब यांच्यातर्फे दिलेल्या अर्जातील म्हणणे कायदेशीर व प्रामाणिक नाही त्यामुळे त्यांचा गैरहजेरीचा अर्ज नामंजुर करण्यात यावा असे लेखी म्हणणे मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकुण सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन नं. (सी.) ६९९/२०२१ चे निर्देशाप्रमाणे खा. संजय राऊत यांना यांना फौजदारी खटल्यास रक्कम रु ५०००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट (बेलेबल वॉरंट) जारी केले.