नाशिक

संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे आज वितरण

डॉ. धनश्री आठवले-तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : प्रतिनिधी
कै. डॉ. वि. म. गोगटे यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणार्‍या संस्कृत भाषा सभा आणि सावाना यांच्यावतीने देण्यात येणारा संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे आज, मंगळवार (दि. 3) रोजी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे वितरण होणार आहे.
यंदाचा संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्कार-2026 संस्कृत भाषा प्रसारिणी सभा, ठाणे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कारार्थी संस्थेला 21 हजार रुपये पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहेत. गुजरात विद्यापीठाची डी.लिट.प्राप्त स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री आठवले-तळवलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्कृत भाषा प्रसारिणी सभा, ठाणे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हजीरनीस, संस्था कार्यवाह ऋतुजा वेलणकर संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. संस्कृत भाषा सभा, नाशिकच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख व कोषाध्यक्ष शोभा सोनवणे लिखित श्रीविष्णुसहस्त्रनाम पुस्तक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख, उपाध्यक्ष श्रद्धा शहा, सहकार्यदर्शिनी तेजश्री वेदविख्यात, स्वाध्यायी परिवाराचे राजीव पटेल, सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे.

Sanskrit Language Conservation Work Award Distribution Today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago