सप्तशृंगी गडावरील मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण
सप्तशृंगी गड : प्रतिनिधी
सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी मीना भोये या मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी नियंत्रित करण्यासाठी उभ्या होत्या त्याच वेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलातील सुरक्षारक्षक वैभव शेलार हा कर्मचारी देखील होता मात्र अचानक या कर्मचाऱ्यांने आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी मीना भोये यांच्या डोक्यात हातातील बंदूक मारली यात मीना भोये जखमी झाल्या भोये यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटने संदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जॉन भालेराव यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात जाणून-बुजून डोक्यात बंदूक मारल्याचे दिसून येत आहे यादरम्यान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांनी बंदूकधारी वैभव शेलार विरुद्ध भादवी कलम 324 प्रमाणे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास कळवण चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलीस कर्मचारी शरद शिंदे भामरे आदी करीत आहेत.