सप्तशृंगीचे विलोभनीय रूप आले समोर

कळवण : प्रतिनिधी

आद्यस्वयंभू सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे संवर्धनाचे कामकाज सुरू होते. संवर्धनाचे काम सुरू असताना श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. तेजोमय, प्रफुल्लित विलोभनीय अशा स्वयंभू मूळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी दि. ८ रोजी पार पडला.आदिमाया सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आज सप्तश्रृंगगडावर चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. दरम्यान आज १० वाजता सकाळी आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची आदिमायेच्या जयघोषात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. श्री भगवती मंदिरात रंगबेरंगी आकर्षक फुलांच्या माळांची केलेली आरास व त्यात आदिमायेस महावस्त्र परिधान करुन सोन्याचे मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, नथ, तोडे, कर्णफुले, चांदीचा मुकुट,  अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता. प्राचीन मूळ मूर्तीतील आदिमायेची हर्षीत, प्रफुल्लित असलेले विलोभनीय रूप पाहायला मिळाले. दि. ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत श्री भगवतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पुरोहित वर्गाच्या मंत्रोच्चाराने धार्मिक वातावरणात पार पडला    विविध धार्मिक पिठातील विद्वान / धर्मशास्त्र पारांगत श्री गणेश्वरशास्त्री द्राविड (धर्म मार्तंड) (काशी / वाराणसी), श्री. राजराजेश्वर द्राविड, धारवाड (कर्नाटक) यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. शांताराम भानुसे, नाशिक, श्री. भालचंद्र शौचे, नाशिक, श्री. बाळकृष्ण दिक्षीत, त्र्यंबकेश्वर, श्रीक्षेत्र नाशिक, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व  श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहीत संघाच्या वतीने धार्मिक पूजाविधी ६ ते ८ सप्टेंबर २०२२ दरम्यान श्री भगवती मंदिरात सहस्त्र कलश स्नान, संप्रोक्षण विधी, उदक शांति, कलाकर्षन इत्यादी धार्मिक पूजा विधी पूर्ण करण्यात आली. दि. ०७सप्टेंबर रोजी श्री भगवती मूर्तीचे सर्व अवयव साक्षात सप्तशृंगी कलश रूपाने कलशात स्थापित असल्याने सदर कलशाचे गेल्या ४५ दिवसापासून विधी युक्त पद्धतीने यथा सांग भगवतीचे सप्तशती पाठ पुंजीका स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष या संपूर्ण विधी करून गेल्या तीन दिवसांपासून आई भगवतीची प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू असून सायंकाळी ७.०० वा. कलशाची सप्तशृंगगडावर भव्य अशी मिरवणूक काढण्यात येवून, दि. ०८/०९/२०२२ रोजी कलश विधीयुक्त पद्धतीने पुरोहितांचा मंत्रोपचाराने आई भागवतीस समर्पित करण्यात येवून  भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्तीची अध्यक्ष . वर्धन पी. देसाई, विश्वस्त तथा तहसिलदार  बी. ए. कापसे, विश्वस्त अॅड.  ललित निकम, डॉ.  प्रशांत देवरे व . भूषणराज तळेकर यांचे हस्ते श्री भगवतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  यावेळी प. पू . सोमेश्वरानंद महाराज, विष्णूगिरी महाराज, शिवगिरी महाराज, दिनेशगिरी महाराज, गणेशपुरी महाराज, ऋषीकेश नंदगिरी महाराज यांसह आ.  नितीन पवार, आ. देवयानी फरांदे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस उप निरीक्षक महेश निकम, सहा. पोलिस निरीक्षक बबन पाटोळे तसेच सप्तशृंगगड येथील सरपंच ग्रामस्थ, नांदूरी येथील सरपंच उपस्थित होते.

संपूर्ण पितृपक्षात १ ६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीच्या सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वी होत आहे.  शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी श्री भगवती मंदिर हे भाविकांना श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

पूर्वनियोजन व सुरू असलेल्या कार्यवाही नुसार श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे येणाऱ्या भाविकांना दरम्यानच्या मंदिर बंद काळात पहिली पायरी येथे श्री सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीच्या दर्शनाची पर्यायी व्यवस्था तसेच नवरात्री पूर्वी येणाऱ्या ज्योत संदर्भीय भाविकांना मशाल / ज्योत प्रज्वलित करण्याची व्यवस्था देखील पहिली पायरी – प्रवेशव्दार येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रसादालय, भक्तनिवास व धर्मांर्थ दवाखाना व इतर अनुषंगिक विविध सेवा-सुविधा विश्वस्त संस्थेच्या वतीने सात्तत्यपूर्वक सुरू असतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *