उत्तर महाराष्ट्र

सप्तशृंगी मातेच्या चैत्र उत्सवास प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. सकाळची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यामुर्ती सुनिल बी. शुक्रे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नाशिक . अभय एस. वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष तथा अति. सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितिन आरोटे, विश्वस्त ललित निकम, सौ. मनज्योत पाटील, डॉ. . प्रशांत देवरे, . भूषणराज तळेकर, व्यवस्थापक . सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
चैत्रौत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून एकूण २६९ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षरक्षकांसह महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत एन वेळेस उदभवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली असून विश्वस्त संस्थेच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व विश्वस्त संस्थेचे एकूण ३ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० हंगामी कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आलेली आहे. दि. १०/०४/२०२२ ते दि. १६/०४/२०२२ दरम्यान पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी १०० एस टी बसेस प्रवाशांना नांदुरी येथून ने – आण करणार आहे चैत्र उत्सव  यशस्वीतेसाठी विश्वस्त संस्थेचे कार्यकारिणी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारीjb श्री. भिकन वाबळे आदींसह विविध विभाग प्रमुख, सहा विभाग प्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड, पोलिसही झाले चकित

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी   त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…

11 hours ago

हिट अँड रन: शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेने मृत्यू

डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…

13 hours ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…

15 hours ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…

15 hours ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…

16 hours ago

अश्व धावले रिंगणी

इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…

16 hours ago