दागिन्यांच्या अपहार प्रकरणी सराफावर गुन्हा दाखल
नाशिक :प्रतिनिधी
सराफ व्यावसायिकासह आणखी एकावर कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार करुन मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गिरीश पोतदार या
साठ वर्षीय व्यक्तिने अंबड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक कोटी सतरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त व्यक्तिने याप्रकरणी अंबड पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार त्याचे व नातेवाइकांच्या सोने, चांदीच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. श्याम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, शंकर पंडित गोडसे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.