नाशिक

सरस्वती गटारगंगा तर शिवनदीला पाणवेलींचा विळखा

सिन्नरकरांची अनास्था अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

सिन्नर ः प्रतिनिधी
तीन-तीन नद्यांचा सहवास लाभलेल्या सिन्नरकरांची अनास्था अन् प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नद्यांचा श्वास कोंडला असून, शहरातून वाहणार्‍या सरस्वतीची गटारगंगा झाली तर शहराजवळून वाहणार्‍या शिवनदीला पाणवेलींचा विळखा पडल्याने या नद्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे.
ढग्या डोंगरावर उगम असलेली सरस्वती नदी शहराच्या मध्यातून वाहते, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्‍या सरस्वतीला गेल्या काही वर्षांमध्ये गटारीचे स्वरूप प्राप्त झाले असून, नदीच्या काठावर वाढत्या अतिक्रमणामुळे नदीपात्र अगदी छोटे झाले असून, त्यातच नाशिकवेस परिसरात भरणार्‍या भाजीपाला बाजार व इतर व्यावसायिकांचा कचरा या नदीपात्रात टाकला जात असल्याने नदीचा प्रवाह खुंटला आहे. काही वर्षांपूर्वी शहरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नदीने रौद्र रूप धारण केल्याने अनेक व्यावसायिकांसह घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. आजही सरस्वतीच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
शहराजवळून वाहणार्‍या शिवनदीचीही वेगळी अवस्था नाही. शिवनदीच्या पात्रात पाणवेलींनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे या नदीचा प्रवाहही खुंटला आहे. संगमनेर नाक्याच्या पुढे सरस्वती व शिवनदीचा संगम होतो. या दोन्ही नद्या पुढे जाऊन कुंदेवाडीजवळ देवनदीला मिळतात. मात्र, या दोन्ही नद्यांची दुरवस्था झाल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन कुंदेवाडीपर्यंत पाणी पोहचण्यास अडचणी येत आहेत. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कुंदेवाडी येथून सायाळेपर्यंत पूरकालवा करण्यात आला असून, पश्चिमेचे पाणी पूर्वभागात नेण्यासाठी हा कालवा उपयुक्त ठरत आहे. मात्र, नद्यांचा प्रवाह खुंटल्यावर पूर्व भागापर्यंत पाणी कसे पोहचणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने सरस्वती व शिवनदीच्या प्रवाहातील अडळे दूर करून या दोन्ही नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

3 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

3 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

3 hours ago

सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…

3 hours ago

शाही थाटात चमका- लेहंग्यांचे ग्लॅमरस अवतार

लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…

3 hours ago

फाउंडेशन आधी की कन्सीलर?

परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…

4 hours ago