तीस हजारांची लाच घेताना सोग्रसचे सरपंच, उपसरपंच जाळ्यात

तीस हजारांची लाच घेताना
सोग्रसचे सरपंच, उपसरपंच जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोग्रस ता. चांदवड येथील सरपंच, उपसरपंच तीस हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55),  आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) अशी या लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या  मित्राने जिल्हा परिषदेतंर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने ईलोसे क्र 1 यांनी सही करून पाठवण्यासाठी इलोसे क्र 1 व 2 यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50,000/-  रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सापळा अधिकारी उपअधीक्षक अनिल बडगुजर,  दिपक पवार. संजय ठाकरे
यांच्या पथकाने अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर  अपर अधीक्षक माधव रेड्डी  उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
Bhagwat Udavant

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

11 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

11 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

11 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

11 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

11 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

12 hours ago