अवघ्या काही तासात सार्थक ला मिळाले त्याचे कुटुंब

 

अवघ्या काही तासात सार्थक ला मिळाले त्याचे कुटुंब

लासलगाव: समीर पठाण

लासलगाव बस स्थानकावत हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्याच्या घरी सुखरूप पोहोचविण्यात लासलगाव पोलिसांना यश आले.
लासलगाव पोलीस स्टेशनच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासांमध्येच सार्थकला त्याच्या कुटुंबाचा शोध लागला. त्यामुळे पिंपळद येथील रहिवाशांनी लासलगाव पोलीस ठाण्याचे आभार मानले आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव बस स्थानकात तीन वर्षांचा बेवारस मुलगा सापडला असल्याबाबत बस आगाराचे नियंत्रक उखाडे यांनी शहरात पेट्रोलिंग साठी फिरत असलेले पोलीस हवालदार कैलास महाजन,पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांना याबाबत माहिती दिली.

लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने बेवारस मुलाकडे माहिती हस्तगत करत त्याच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी पथक निर्माण करून सोशल मीडियावर सदर मुलगा हरविल्याबाबत माहिती प्रसारित केली.सदर हरवलेला मुलगा पिंपळद येथील सार्थक घोगरे असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सदर बालकाला सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास महाजन,पोलीस नाईक देवीदास पानसरे पो कॅा प्रदीप आजगे,पो कॅा सुजय बारगळ मपोकॅा माया वाघ यांनी त्याचे आजोबा शिवनाथ बाबुराव घोगरे रा. पिंपळद ता.चांदवड यांचे ताब्यात देण्यात आले. हरवलेल्या सार्थकला सुखरूप घरी आणल्याबद्दल घोगरे कुटुंबीयांनी लासलगाव पोलिसांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *