नाशिक

सर्वतीर्थ टाकेद – वासाळी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

वाहनचालकांना खड्डयांमुळे मार्ग काढताना मोठी कसरत

वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ते वासाळी रस्त्याची खड्डयांमुळे पुरती वाट लागली आहे. वाहनचालकांना खड्डयांमुळे मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांमुळे वाहनांची अवस्था खिळखिळी झाली असून, वाहनचालकांचेही पाठीचे दुखणे वाढले आहे. जिल्ह्याच्या अखेरच्या सीमेवर आलेल्या रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असल्यामुळे चालकांचे कमरेचे दुखणे वाढत आहे.
टाकेद-बांबळेवाडी रस्त्याची अवस्था पावसाने खराब झाली आहे. हा रस्ता पर्यटन रहदारीचा असून, सर्वतीर्थ टाकेद आणि कळसूबाई शिखर, शेंडी-भंडारदरा, भावली धरण, तसेच इगतपुरी- कसारा- मुंबईकडे जाण्यास मोठी रहदारी असते. नाशिक येथून येणार्‍यांना हा जवळचा मार्ग आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहिले असल्याने त्यातून वाहने फार जपून चालवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याचा मोठा धोका आहे.
पावसाळा आला की खड्डे वाढलेच समजा, अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. लाखो,कोटींच्या विकासकामांचे दावे करणार्‍या प्रशासनाने रस्त्यावरील खड्डयांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कामाची दर्जाहीनता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालले आहेत. दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत समृद्धीसह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणार्‍या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो, मेट्रो आणि बुलेट ट्रेन चालविणार्‍या महाराष्ट्रात आजची ग्रामीण भागाकरिता दळणवळणासाठी सुविधा जटिल आहे. डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. पण ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago