नाशिक

सातपूरला अतिक्रमणाचा हादरा

सातपूर येथील वनविभागाच्या
जागेवर अनधिकृत पणे तीस वर्षापासून व्यावसायिक अतिक्रमणे मनपा प्रशासन, पोलीस बंदोबस्तात सोमवारी २ मार्च रोजी हटवण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कारवाई अखेर पार पडली.या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.
संबंधित प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,संबंधित वन विभागाच्या जमिनीवर व्यावसायिकांनी विनापरवाना पत्रा शेड आणि टपऱ्यांचे अतिक्रमण केले होते. वन विभागाच्या माध्यमातून संबंधितांना वारंवार नोटिसा बजावून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न काढल्याने अखेर प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कारवाई सुरू होताच काही टपरीधारक व्यावसायिकांनी याला कडाडून विरोध केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस अधिकारी व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या नागरिकांना कायद्याची समज दिली आहे,” असे सांगत प्रशासनाने कोणाचेही ऐकून न घेता कारवाई सुरूच ठेवली होती त्या ठिकाणी एका जागृत देवीचे मंदिर असल्यामुळे अनेक वेळा नागरिकांनी गोमास विक्री तसेच नॉनव्हेज हॉटेलवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केलेल्या होत्या ही संपूर्ण बाब लक्षात घेता प्रभाग 11 मधील लोकप्रतिनिधी यांनी आवाज उचलल्यानंतर नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी पाहणी करत तात्काळ अतिक्रमण जमीन उध्वस्त करण्यासाठी सांगितले
कार्यवाही वेळी अतिक्रमण जेसीबी कर्मचारी तसेच वाहने जेसीबी या सह पोलीस प्रशासनाच्या वतीने सातपूर अंबड चिंचोळे येथील पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी एस आर पी दाखल झालेले होते यासाठी सकाळपासूनच रूग्नवाहिका, अग्निशमन दल ,ड्रोनद्वारे चित्रीकरणा सह,पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago