सातपूर प्रबुध्द नगरला एक पाऊल स्वच्छतेकडे   

सातपूर प्रबुध्द नगरला एक पाऊल स्वच्छतेकडे

 

सातपूर: प्रतिनिधी

एक पाऊल स्वच्छतेतुन सुविधेपर्यंत,स्वच्छ प्रभाग व स्वच्छ चारित्र्य हीच आमची ओळख या मोहिमेतून कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने व माजी नगरसेविका शोभाताई दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व स्वच्छतागृह दुरुस्ती आणि त्यांचे नूतनीकरण या आगळ्या वेगळ्या अनोख्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा आज रविवारी रोजी सकाळी प्रबुद्धनगर,महिंद्रा गेट समोर, सातपूर येथे सामाजिक कार्यकर्त्या हर्षाताई अविनाश दोंदे व जयश्री अर्जुन धोत्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान,यावेळी कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र सपकाळ आणि सातपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, विठ्ठल सैंदाणे यांच्या  हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते,अर्जुन धोत्रे,अंकुश खाडे, किरण गुंजाळ, एकनाथ शिंदे,प्रदीप पवार,विलास पवार, सुवर्णदास शिरसाठ,संगीता खाडे,अनिता खाडे,मालती रामराजे,सुनिल मौले तसेच प्रबुद्धनगर येथील नागरिक व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *