सातपूर प्रबुध्द नगरला एक पाऊल स्वच्छतेकडे
सातपूर: प्रतिनिधी
एक पाऊल स्वच्छतेतुन सुविधेपर्यंत,स्वच्छ प्रभाग व स्वच्छ चारित्र्य हीच आमची ओळख या मोहिमेतून कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने व माजी नगरसेविका शोभाताई दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व स्वच्छतागृह दुरुस्ती आणि त्यांचे नूतनीकरण या आगळ्या वेगळ्या अनोख्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा आज रविवारी रोजी सकाळी प्रबुद्धनगर,महिंद्रा गेट समोर, सातपूर येथे सामाजिक कार्यकर्त्या हर्षाताई अविनाश दोंदे व जयश्री अर्जुन धोत्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान,यावेळी कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र सपकाळ आणि सातपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, विठ्ठल सैंदाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते,अर्जुन धोत्रे,अंकुश खाडे, किरण गुंजाळ, एकनाथ शिंदे,प्रदीप पवार,विलास पवार, सुवर्णदास शिरसाठ,संगीता खाडे,अनिता खाडे,मालती रामराजे,सुनिल मौले तसेच प्रबुद्धनगर येथील नागरिक व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…