सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून
संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध
सातपूर: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही, ३९ वर्षीय युवकाची काही अज्ञात हल्लेखोरांकडून धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कार्बन नाका परिसरातील आनंद छाया हाईट्स या परिसरात ही घटना घडल्याचे समजते प्रकाश मधुकर सुर्यवंशी, वय ३९ असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलेले नाही. सुर्यवंशी यांच्या पत्नी सुवर्णा प्रकाश सुर्यवंशी यांनी ११ एप्रिल रोजी जिल्हाशासकीय रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान सुर्यवंशी यांचा मृत्यु झाला मात्र या हत्येच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे, यांनी तात्काळ घटस्नास्थळी जाऊन पहाणी केली आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…