शुभांगी पाटील 29 हजार मतांनी दारुण पराभूत
महाविकास आघाडीला धक्का
नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीध्रर निवडणुकीत अपक्ष उमेद्वार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा
तब्बल 29 हजार 465 मतांनी दारुण पराभव केला. या विजयाने तांबे यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. पाचव्या फेरीत तांबे यांनी 68 हजार 999 मते घेत विजय खेचून आणला . शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मिळाली. दरम्यान पदवीधरांनी पुन्हा एकदा तांबे घराण्यावर विश्वास दाखावत सत्यजित तांबे यांना विधानपरिषदेवर पाठविले. रात्री अकरा वाजता पाचव्या फेरीचा कल हाती आला. दुसऱ्या फेरी पासूनच तांबे यांनी विजयाकडे कूच केली होती
नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होती. गुरुवारी (दि.2) सकाळ्पासून सैय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीची प्रक्रियेस सुरवात झाली. गुरुवारी दुपारी अडीच वाजेला पहिल्या फेरीला सुरवात झाली. पहिल्यां फेरीतच तांबे यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 एवढीच मते मिळाली. पहिल्या फेरीतच तांबे यांना 7 हजार 922 मतांची मोठी आघाडी मिळाली. पुढे ही आघाडी दुसऱ्या फेरीत ही कायम राहत तांबे यांना 31 हजार तर शुभांगी पाटील यांना 16 हजार 316 एवढी मते पडली. तीसऱ्या फेरीत पुन्हा तांबे यांनी आघाडी कायम ठेवत 45 हजार 660 मतांचा पल्ला पार पाडला. शुभांगी पाटील या 24 हजार 927 एवढ्या मतांवरच राहिल्या. तिसऱ्या फेरी पर्यंत शुभांगी पाटील 20 हजार 733 मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या. तिसऱ्या फेरीअखेर झालेल्या मतदानापैकी 84 हजार मतांची मोजणी झालेली होती. चौथ्या फेरीत सत्यजित तांबे ना 60 हजार 161 पर्यत मतदान गेले तर शुभांगी पाटील यांना अवघी 33 हजार 776 मत्तापर्यत जाते आले. यानंतर पाटील तब्बल 26 हजार मतांच्या फरकाने मागे पडल्या होत्या. चौथ्या फेरी पर्यंत 1 लाख 12 हजार पर्यंत मतांची मोजणी झाली होती. अखेर पाचव्या फेरीत 29 हजारांनी तांबे यांनी पाटील यांचा पराभव केला. दरम्यान नाशिक पदवीधरासाठी सोमवारी (दि.30) मतदान झाले होते. एकूण 2 लाख 62 हजार मतदानापैकी केवळ 1 लाख 29 हजार 456 मतदान होउन 49.28 टक्के मतदानाची टक्केवारी झाली होती. गुरुवारी सकाळपासून मतदानाचे गठ्ठे तयार लावून प्रत्यक्षात दुपारी अडीच वाजेला पहिल्या फेरीला सुरवात झाली होती.
यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत
नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रारंभी पासून मोठे नाट्य पाहवायस मिळाले. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली.मात्र तीन वेळेसचे आमदार डॉ. तांबे यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यांच्याजागी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली होती. तांबे परिवाराने कॉग्रेसचा घात केल्याचा आरोप कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येऊन पिता पुत्रांचे पक्षातून निलंबणं देखील कारण्यात आले. या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळेच तांबे विरुद्ध पाटील यांच्यातच ही लढत होणार होती. हा सामना अटीतटीचा होईल अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र अनुभवी असलेले डॉ. तांबे व त्यांचे पुत्र सत्यजित यांनी या सर्व चर्चा आणि दावे फोल ठरविले.
भाजपचा प्लॅन यशस्वी
सत्यजित तांबे यांच्यापाठीमागे भाजप असून तांबे यांच्या विजयासाठी अगदी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते. इतरत्र भाजपला अपयश आले असले तरी नाशिक पदवीधर निवडणुकीत आम्ही दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे तांबे यांचा विजय सहज झाल्याचे भाजप पदाधिकारी बोलू लागले आहेत. दरम्यान यावरुन भाजपने प्रत्यक्षात उमेद्वार न देता त्यांचा प्लॅन यस्यशस्वी करुन दाकह्वल्याची चर्चा आहे.
…..
काँग्रेसचे वरून पाटील, आतून तांबे
सलग तीन वेळेस नाशिक पदवीधरचे आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांचे सर्वाशी चांगले संबंध असल्याने याचीच परिणीती म्हणून की, काय नाशिक जिल्हयाश इतर ठिकाणी कॉग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सत्यजित तांबे यांच्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेद्वार जरी निवडणुकीच्या रिंगणात होता. प्रत्यक्षात मात्र कॉग्रेसच्या काही पदाधिकाऱ्याक़्कडून तांबे यांच्यासाठी काम केल्याची चर्चा होती.
….
चार फेरीत दोन्ही उमेदवारांना पडलेली मते
सत्यजित तांबे –
पाहिली फेरी – 15 हजार 784
दुसरी फेरी – 31 हजार 9
तिसरी फेरी- 45 हजार 660
चौथी फेरी – 60 हजार 161
पाचवी फेरी – 68 हजार 999
…..
शुभांगी पाटील
पाहिली फेरी – 7 हजार 862
दुसरी फेरी – 16 हजार 316
तिसरी फेरी -24 हजार 927
चौथी फेरी 33 हजार 776
पाचवी फेरी – 39 हजार 534