सावानाचा  कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर 

नाशिक : प्रतिनिधी
सावानाच्या वतीने देण्यात येणारा
स्व.माधवराव लिमये   कार्यक्षम आमदार/खासदार  पुरस्कार यंदा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री भाजपचे आमदार  सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सावाना अध्यक्ष  दिलीप फडके यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव , सचिव धर्माजी बोडके ,सहाय्यक सचिव अॅड .अभिजित बगदे, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर,प्रशांत जुन्नरे उपस्थित होते.
यंदाचे हे  पुरस्काराचे  19 वे वर्ष आहे.पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रोख ,स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे आहे. स्व.माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ.शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून सदरचा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधान सभा, लोक सभा, राज्य सभा ह्या पैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड करीत असते. सन 2021-22 च्या कार्यक्षम आमदार , खासदार पुरस्कारासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व पत्रकार जयप्रकाश पवार, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. सौ. शोभाताई नेर्लीकर, डॉ आर्चिस नेर्लीकर, तसेच सार्वजनिक वाचनालयाचे पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके या सदस्यांच्या निवड समितीवर
पुरस्कार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

2 thoughts on “सावानाचा  कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर 

  1. योग्य व्यक्ती स सावांना चा पुरस्कार जाहीर झाला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *