नाशिक

सावाना निवडणुकीसाठी 90 अर्ज दाखल

अध्यक्षपदासाठी 4 तर उपाध्यक्ष पदासाठी 5 अर्ज दाखल
नाशिक : प्रतिनिधी
सावानाच्या पंचवार्षिक  निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या  अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी 3 उपाध्यपदासाठी 2 तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी   22  अर्ज दाखल झाले.   तर अर्ज दाखल करण्याच्या  अखेरच्या दिवशी पर्यंत   अध्यक्षपदासाठी एकूण  4, उपाध्यक्ष पदासाठी 5 तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी 81 असे एकूण 90 अर्ज दाखल झाले आहेत. तर छाननी नंतर या ९० उमेदवारांमधून अंतिम उमेदवार ठरणार आहेत.   अर्ज विक्रीचा  काल  शेवटचा दिवस होता. तीन दिवसात १२८ अर्जाची विक्री झाली त्यापैकी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  शुक्रवारी अर्ज छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी शनिवारी प्रसिद्ध होणार आहे.
अध्यक्षपदासाठी वसंतराव खैरनार, दिलीप फडके, मकरंद सुखात्मे आणि विलास पोतदार यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर   तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील कुटे, मानसी देशमुख, दिलीप धोंडगे, वैद्य विक्रांत जाधव, बाळासाहेब गुंजाळ यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच  मिलिंद गांधी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज नेला होता. मात्र, दाखल केला नाही. तर समीर शेटे, हंसराज वडघुले, डॉ. धर्माजी बोडके, रवींद्र कदम, प्रशांत पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज नेले होते मात्र, त्यांनी अर्ज दाखल केले नाही.
Bhagwat Udavant

Recent Posts

टायर फुटल्याने बिंग फुटले

टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे‌…

2 hours ago

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…

2 hours ago

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…

2 hours ago

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

3 hours ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

4 hours ago

आरोग्य कर्मचार्‍यांचा सेल्फी हजेरीला विरोध

जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्‍यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक…

4 hours ago