सावानाच्या बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ


नाशिक : प्रतिनिधी
कै. रत्नाकर गुजराथी हे वाचनालयाचे जुने पदाधिकारी होते. त्यांनीच हे
बालनाट्य स्पर्धेचं रोपट लावलेलं आणि वाढवलेलं आहे असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामालेच्यावतीने कै.रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेच्या उद्घघाटनप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी केले. या
प्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्ष गिरीश नातू, अर्थ सचिव
देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, ग्रंथ
सचिव जयप्रकाश जातेगावकर इत्यादी मान्यवर
विराजमान होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मोहिनीदेवी
रुंगठा प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे गृहपाठला सुट्टी तर पुष्पावती रूंगठा हायस्कूलचे आणि.. शाळा सुरू झाली ही दोन बालनाटये सादर झाली. कोरोनानंतर
शाळा सुरू होतांना मुलांना गृहपाठ देण्याऐवजी
त्यांच्याकडून विविध उपक्रमांद्वारे अभ्यासाचा सराव
करून घेणे बाबत विषय गृहपाठाला सुट्टी या नाटकातून
मांडण्यात आला तर आणि.. शाळा सुरू झाली या
बालनाट्यातून कोरोना काळात बंद होणारी आणि कोरोना
नंतर सुरू होणारी शाळा यावर भाष्य करण्यात आले.
स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 14 शालेय तसेच नाट्यसंस्थांनी
सहभाग नोंदवलेला आहे. परीक्षक म्हणून सुभाष पाटील,
श्रीराम वाघमारे, पल्लवी ओढेकर हे काम पाहत आहेत.
कार्यक्रमाला जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, अजय
कापडणीस, सेवकवृंद – सुचित्रा मोरे, अपेक्षा देशपांडे,
योगिनी जोशी, दिलीप बोरसे, किरण पालवी, विद्या
डामसे तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बालभवन प्रमुख,
प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
गीतांजली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन
करण्यात आले.

आज सादर होणारी नाटक :
उद्या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 8.30 ते
दुपारी 4 वाजे दरम्यान तुला इंग्रजी येतं का?, पिढीजात,
आम्हाला पण शाळा पाहिजे, मिशन मास्तर, रिले आणि
बदला ही सहा बालनाट्य सादर होणार आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ लासलगाव:  वार्ताहर देवगाव ता.निफाड येथील २२ वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह…

20 hours ago

इंदिरानगरमध्ये दांपत्याची मुलीसह आत्महत्या

सिडको : विशेष प्रतिनिधी इंदिरानगर भागात एका घरात तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली…

3 days ago

चुंचाळे अंबड भागातील म्हाडा कॉलनी येथे बिबट्याचे दर्शन

सिडको विशेष प्रतिनिधी -चुंचाळे अंबड भागातील म्हाडा कॉलनी येथे दोन दिवसापूर्वी येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन…

1 week ago

माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत!

माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत! गणेश मंडळाना भेट देऊन केली महाआरती...! नांदगाव:…

1 week ago

मनमाडला ठेकेदाराकडून दिवसाढवळ्या वीज चोरी करून काम सुरु…! महावितरण कारवाई करेल का..?

मनमाडला ठेकेदाराकडुन दिवसाढवळ्या वीज चोरी करून काम सुरु...! महावितरण कारवाई करेल का..? मनमाड:  प्रतिनिधी महावितरण…

2 weeks ago

शिंदेगावात फटाक्याच्या कंपनीला भीषण आग

शिंदेगावात फटाक्याच्या कंपनीला भीषण आग नाशिकरोड : प्रतिनिधी देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते…

2 weeks ago