नाशिक

सावानाच्या युवा साहित्य महोत्सवाचा समारोप

आ. सत्यजित तांबे यांची उपस्थिती; काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण

नाशिक : प्रतिनिधी
साहित्य क्षेत्रात युवकांचे मोठे स्थान आहे. युवा साहित्यक आज सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. सोशल माध्यम हे नवीन पिढीचे वाचनाचे माध्यम आहेच, पण त्याचबरोबरच पुस्तक वाचन संस्कृती टिकली पाहिजे, सावानाने आयोजित केलेल्या या महोत्सवामुळे युवा साहित्यीकांना व्यासपीठ उपलब्ध झाले. सावानाला यापुढील काळात जी काही मदत लागेल, ती करत राहू. असे आश्‍वासन पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. सावानाच्यावतीने आयोजित युवा साहित्य महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते  वाचन संस्कृती वृद्धिंगत करणार्‍या भिमाबाई जोंधळे यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी काव्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात करण्यात आले.
युवा साहित्य महोत्सवाच्या दुसर्‍यादिवशी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत सावाना युवा साहित्य महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ. जगन्नाथ पाटील यांनी  कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये मला एका नव्या परंपरेला एका नव्या इतिहासाला सुरुवात करण्याच्या क्षणासठी सावानाने बोलावले. सावानाच्या या 150 वर्षा पेक्षा जास्त परंपरा असलेल्या सावानाने पहिल्यांदा युवा साहित्य महोत्सवाचे आयोजन केले. साहित्य जर युवकांशी जोडलेले नसेल तर कदाचित देशाचे भवितव्य ठीक असणार नाही असे मला वाटते. युवा साहित्य महोत्सवात सुप्रसिद्ध ब्लॉगर तन्वी अमित यांनी ब्लॉग कसा लिहावा, याविषयी मार्गदर्शन करतांना ब्लॉग या शब्दाची मराठीतून व्याख्या स्पष्ट केली.  आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी ब्लॉगिंग हे उत्तम माध्यम आहे.  परंतु आज हीच सर्व माहिती इंटरनेट च्या सहाय्याने वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्लॉगिंग चा वापर केला जातो. यावेळी  त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.

परिसंवादाची मेजवानी
युवा साहित्य महोत्सवामध्ये संवादक किरण सोनार यांनी परिसंवदास सुरुवात केली.  यामध्ये अमोल चिने, संकेत शिंदे, प्रतिक जोशी, प्राजक्ता नागपुरे, प्रिया जैन, अश्विनी भालेराव आणि मुग्धा थोरात यांनी डिजिटल वाचन की ग्रंथ वाचन या विषयीच्या परिसंवादात  प्रत्यक्षात पुस्तक वाचन का डिजिटल वाचन यावर त्यांनी चर्चा केली.
अश्विनी भालेराव व प्राजक्ता नागपुरे यांचा कल प्रत्यक्ष पुस्तक वाचनाकडे होता. तर अमोल चिने आणि मुग्धा थोरात ह्यांचा कल सुवर्णमध्य साधण्याकडे होता. एकंदरीत परिसंवादातून डिजिटल असो अथवा प्रत्यक्ष पुस्तक वाचन असो युवकांचा वाचनाकडे कल वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पासून सुरवात करावी वाचाल तर वाचाल हे युवकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.यावेळी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुनील कुटे, कार्याध्यक्ष गिरीश नातू , सहाय्यक सचिव ड अभिजित बगदे ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर,, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, बालभवन प्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ, कार्यकारी मंडळ सदस्य श्रीकांत बेणी व गणेश बर्वे, युवा साहित्य समिती सदस्य उपस्थित होती.

युवा कवींच्या कवितांनी रंगत

प्राथमिक फेरीतून  निवड झालेल्या 25 युवा कवींनी बहारदार कविता सादर केल्या.रोजगारासाठी इथ दंगल घडत नाही,तुझ ते रूप ,मै ही हिंदुस्थान  हूॅ,जगण मात्र राहून गेल यासह विविध विषयावरील कविता सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली.

काव्य स्पर्धेत यांनी मारली बाजी
प्रथम क्रमांक -प्रमोद वनदेव घोरपडे
द्वितीय क्रमांक -मानसी सुनील कावळे
तृतीय क्रमांक- ऐश्वर्या अण्णासाहेब नेहे
उत्तेजनार्थ -१)सिदराम विष्णू सोळंकी २)अन्सारी नगमा परविन अश्रफ
Ashvini Pande

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

16 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago