सावरकरनगरला महावितरणच्या उघड्या डीपीमुळे धोका

उघडी डीपी ,वाढवी बीपी
सावरकर नगरला महावितरणच्या डीपीमुळे धोका
नाशिक: सातपूर कॉलनीतील सावरकरनगर येथील महावितरण कंपनीच्या डीपी ला झाकण नसल्याने व डीपी भोवती मोठ्याप्रमाणात गवत वाढल्याने धोका निर्माण झाला।आहे, लहान मुले, जनावरे डीपी जवळ जाऊन शॉक बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून दुर्घटना घडल्यास महावितरण ला जबाबदार धरले जाईल, असा इशारा शिवसेना कामगार आघाडीचे पदाधिकारी रवींद्र देवरे यांनी दिला आहे, सावरकर नगर येथील गजानन अपार्टमेंट जवळ डीपी आहे. या डीपी ला झाकण नाही, डीपी भोवती लहान मुले, मोकाट जनावरे जातात. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे करंट उतरून धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत देवरे यांनी महावितरण कडे चार दिवसांपासून पाठपुरावा केला. मात्र सातपूर भागातील महावितरण अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या डीपी ला झाकण न बसवल्यास आणि या भागातील गवत न काढल्यास काही दुर्घटना घडल्यास महावितरण चे अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा रवींद्र देवरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *