सातपुरच्या सावरकर नगरात नागरिकांचा संपर्क तुटला

सातपुरच्या सावरकर नगरात रस्त्यात पाणी, नागरिकांचा संपर्क तुटला

नाशिक: प्रतिनिधी

शहरात 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून, पावसामुळे शहरातील रस्ते एकीकडे पाण्याखाली गेले असतानाच सातपूर च्या सावरकर नगर येथील चेंबर तुंबल्याने अशोकनगर ते सावरकर नगर हा रस्ता बंद झाला आहे, या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना जा ये करता येणे अवघड झाले आहे,

सावरकर नगर येथील गणपती मंदिराकडे अशोकनगरकडून जो रस्ता जातो, तेथे पूर्वी नैसर्गिक नाला होता, परंतु कालांतराने हा नाला बुजला, आता या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या आहेत, या ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी चेंबर आहे, मात्र हे चेंबर वारंवार तुंबते, महापालिका तात्पुरती उपाययोजना करत असते, पण त्याचा उपयोग नाही, काल सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे या चेंबर जवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले, हे पाणी वाहून जाण्याची कोणतीच सोय नसल्याने सर्व पाणी या ठिकाणी जमा झाल्याने पाण्याचा मोठा तलाव निर्माण झाला आहे, या ठिकाणी असलेल्या दुकानदारांच्या दुकानापर्यंत पाणी पोचले आहे, कालपासून या भागातील शिवसेनेचे रविंद्र देवरे, सुभाष महाजन,अकिल शेख, विजय करवा, किशोर पोखरकर, संजय झोपळे, योगेश गोलसर हे महापालिका अधिकाऱ्यांना कळवत आहेत, तक्रारी करत आहेत. मात्र, अधिकारी ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. या ठिकानी साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना कसरत तर करावी लागतच आहे शिवाय  सायकल स्वार पडून जखमी झाले आहेत, महापालिका प्रशासनाने  त्वरित या ठिकाणची समस्या दूर करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशोकनगर च्या नागरिकांना सावरकर नगरातील मंदिरात जाण्यासाठी तसेच अशोकनागरला जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत आहे. महापालिका प्रशासन तातडीने दखल घेईल का, असा सवाल नागरिक विचारत आहे,

पाहा व्हीडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *