महाराष्ट्र

सावाना निवडणुकीसाठी ग्रंथालयभूषण पॅनलच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

नाशिक : प्रतिनिधी 181 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या व जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यविषयक चळवळीत मोलाची भूमिका बजाविणाऱ्या सार्वजनिक वाचनालय,नाशिक(सावाना)च्या 2022 ते 2027 साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा.दिलीप फडके यांच्या नेतृत्वाखालील ग्रंथालायभूषण पॅनल स्थापन करण्यात आले असून त्यात जुन्या आणि नव्या उमेदवारांचा संगम असल्याचे पॅनलच्या पाठीशीच सभासद खंबीरपणे उभे राहतील,असा विश्वास पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केला.
पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी प्रा.दिलीप फडके तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी डॉ.विक्रांत जाधव आणि प्रा.डॉ.सुनील कुटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारी मंडळाच्या 15 जागांसाठीही उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात सर्व क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.रविवार कारांजवरील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन या सर्वांनी एकत्रितरित्या अर्ज दाखल केले व सावानाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
ग्रंथालयभूषण पॅनलच्या नेत्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला असून या पॅनलच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी (दि.21 एप्रिल) दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते विनायक नयनतारा सिटीवन,ऋग्वेद मंगल कार्यालयाजवळ, तिडके अनेक्स येथे फोडण्यात येणार आहे.
वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच वाचनालायला लाभलेला उच्चकोटीचा वारसा जतन करण्यासाठी आम्ही सारे नेटाने प्रयत्न करू आणि सभासद आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास पॅनलचे नेते डॉ.दिलीप फडके यांनी व्यक्त केला.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

15 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

17 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

19 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

19 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

19 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

20 hours ago